नगर – चास ता. नगर येथील रहिवाशी श्रीमती समींद्राबाई विठ्ठलराव गावखरे (वय ८५) यांचे वृद्धापकाळाने राहत्या घरी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात ५ मुले, १ मुलगी, सून, जावई, नातवंडे, पुतणे असा मोठा परिवार आहे. त्या जुन्या पिढीतील प्रगतशील शेतकरी कै. विठ्ठलराव गावखरे यांच्या पत्नी तर राधाबाई काळे महिला महाविद्यालय अहिल्यानगर येथील प्रा. बाळासाहेब गावखरे यांच्या मातोश्री होत्या. अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर चास येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.