कोपरगांव : –
श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात व्यास पौर्णिमेच्या निमित्तानं गुरु-शिष्य परंपरेची महती स्पष्ट करणारी गुरु पौर्णिमा उत्साहाने साजरी झाली.या प्रसंगी महर्षि व्यास यांच्या प्रतिमेचे पुजन मुख्याध्यापक मकरंद कोऱ्हाळकर यांचे हस्ते करण्यात आले.
गुरु पौर्णिमेचे महत्व स्पष्ट करतांना मुख्याध्यापक मकरंद कोऱ्हाळकर यांनी भारतिय संस्कृती मध्ये गुरु-शिष्य परंपरेची थोर परंपरा असुन विदयार्थीनी त्यांची माहीती करुन घेणे आवश्यक आहे असे स्पष्ट केले. या प्रसंगी मुल्यशिक्षण अंर्तगत परिपाठ सादर झाला.
नीदाफातेमा मन्सुरी, मुब्बाशिरा मन्सुरी दिपाली आदमाने, सायली घोडराव, प्रिया मगर यांनी समुहगीतातुन प्रार्थना सादर केली.सुविचार इक्रा पठाण यांनी दिनविशेष प्रणिता आहिरे तर ठळक बातम्या वैष्णवी वाडेकर यांनी प्रस्तुत केल्या. गुरुपौर्णिमा निमित्तानं समूह नृत्य सृष्टी जाधव व रुपाली खामकर यांनी तर बोधकथा साची मुदबखे, प्रश्नमंजुषा तनुष्का सोनपसारे, तसेच गुरु पौर्णिमे विषयी इंग्रजीत माहिती – माहीन शाह, मराठीत तुन – क्रांती लासनकर यांनी सादर केली. शेवटी आभार गौरी राऊत यांनी मानले.. या नंतर परिपाठातील सहभागी विद्यार्थिनीनी शाळेतील शिक्षकांचे औक्षण करून त्यांना छोटीसी भेटवस्तू दिल्या.या कार्यक्रमाचे सुत्र संचलन वेदांत येवले व साई डांगे यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विदयालयांचे शिक्षक कुलदीप गोसावी,योगेश गवळे,पंकज जगताप,संजय बर्डे,सौ.संजीवनी डरांगे,सौ.सुजाता अजमेरे, सौ.पल्लवी तुपसैंदर,सौ.,सौ.राजश्री बोरावके,सौ.एस.आर.गंगवाल,सौ.एस,डी.जाधव,सौ.एस.आर.अजमेरे आदि शिक्षकांनी विशेष परीश्रम घेतले.
गुरु पौर्णिमेच्या निमित्तानं कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दिलीपकुमार अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे,स्थानिक स्कुल कमेटीचे चेअरमन श्री.चंद्रकांत ठोळे,.संदीप अजमेरे,आदिंनी शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला विदयालयाचे मुख्याध्यापक मकरंद कोऱ्हाळकर,उपमुख्याध्यापक आर.बी. गायकवाड,पर्यवेक्षिका यु.एस.रायते आदि बहुसंख्य शिक्षक,शिक्षिका उपस्थित होते.