कोपरगाव : येथील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत जागतिक दिव्यांग दिन उत्साहाने संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक रमेश गायकवाड यांनी केले. जेष्ठ शिक्षिका अंजली गायकवाड यांनी दिव्यांगाचे महत्त्व सांगताना स्टिफन हाॅकींग, हेलन केलर यांचा जीवन परीचय स्पष्ट केला. विदयालयांचे उपमुख्याध्यापक रघुनाथ लकारे व जेष्ठ शिक्षिका राजश्री बोरावके यांचे हस्ते दिव्यांग विद्यार्थीना गुलाब पुष्प देवुन सन्मान करण्यात आला. जेष्ठ शिक्षक अनिल अमृतकर यांनी स्वागत केले.
श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांचे स्थानिक स्कुल कमेटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे ,कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे ,सचिव दीलीप अजमेरे व सहसचिव सचिन अजमेरे,संदीप अजमेरे,डाॅ.अमोल अजमेरे,आनंद ठोळे,राजेश ठोळे,दीलीप तुपसैंदर यांनी जागतिक दिव्यांग निमित्ताने शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमांचे सुत्रसंचलन जेष्ठ शिक्षक बलभीम उल्हारे यांनी तर आभार अतुल कोताडे यांनी मानले. या कार्यक्रमाला दीलीप कुडके, निलेश बडजाते,पंकज जगताप,योगेश गवळे आदी शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.