माजी.आ.कांबळेच्या प्रचार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी श्रीरामपूरात
देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
श्रीरामपूर विधानसभा मतदार संघात विद्यमान आमदार लहु कानडे यांना महायुती तथा राष्ट्रावादी अजित पवार गटा कडून उमेदवारी जाहिर केल्यानंतर महसुलमंञी राधाकृष्ण विखे पाटील हे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या सोबत होते. लहु कानडे यांच्या प्रचार शुभारंभाच्या वेळी विखे कानडेंच्या मागे उभे राहिले. माजी आ.भाऊसाहेब कांबळे एकटे पडले असे वाटत असताना मुख्यमंञी एकनाथ शिंदे सोमवारी श्रीरामपुरात येणार असल्याचे कांबळे यांच्याकडून जाहिर करीत असले तरी महायुतीचा उमेदवार कानडे असताना मुख्यमंत्री शिंदे खरंच श्रीरामपुरात येणार का? आले तरी ते महायुतीच्या उमेदवारा विरोधात बोलणार का?
विद्यमान आ.लहु कानडे यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी डावलल्याने लहु कानडे यांनी राष्ट्रावादी अजित पवार गटात प्रवेश करुन उमेदवारी जाहिर करुन घेतली.याचवेळी महायुतीमधील शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून मुख्यमंञी एकनाथ शिंदे यांनी माजी आ.भाऊसाहेब कांबळे यांना पक्षाची अधिकृत उमेदवारी देवून ऐबी फाँर्म दिला. राज्यात निवडणूका लढविताना भाजपा, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रावादी अजित पवार असे एकञ निवडणूक लढवित असताना.श्रीरामपूर राखावी मतदार संघात महायुतीचे दोन उमेदवार झाल्याने महायुतीचा अधिकृत उमेदवार कांबळे की कानडे या पैकी कोण.? असा प्रश्न केला जात आहे.
अर्ज माघारीच्या दिवशी माजी आ.भाऊसाहेब कांबळे हे उमेदवारी अर्ज माघारी घेतील अशी चर्चा सुरु होती.त्याच्यावर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव येत होता.शांत व चाणाक्ष्य कांबळे अर्ज माघारीच्या दिवशी नाँट रिचेबल झाले.खळबळ उडाली अखेर महायुतीचे दोन उमेदवार एकाच मतदार संघात निवडणूक रिंगणात उतरले. अर्ज माघारीच्या दिवशी महसुलमंञी विखे पाटील यांच्या समवेत माजी आ.कांबळे होते. श्रीरामपूर, बेलापुर,टाकळीमियाँ आदी ठिकाणी कांबळे सोबत घेवून फिरले.लहु कानडे यांच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी श्रीरामपूर येथिल गोंधवणी येथिल महादेव मंदिरात हजेरी लावून लहु कानडे हेच महायुतीचे उमेदवार असल्याचे ठणकावून सांगितले.भाऊसाहेब कांबळे आता पुष्कळ झाले. विश्वासघात केला,आता क्षमा नाही, पाठींबा नाही.विखे पाटील लहु कानडे यांच्या पाठीमागे उभे राहिल्याने, कांबळे एकटे पडल्यासारखे वाटत असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी श्रीरामपूर येथे दाखल होणार आहे. मुख्यमंत्री शिंदे काय बोलणार, व्यासपिठावर कोण उपस्थित राहणार हे महत्वाचे ठरणार आहे.