श्री गणेश कारखान्याच्या मिल रोलरचे विवेक कोल्हे यांच्या हस्ते पूजन  

0

राहाता : गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर गणेश सहकारी साखर कारखाना लि.गणेशनगरचा सन २०२४-२५ हंगामाचे रोलर पूजन जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले.

संजीवनी आणि सगंमनेर यांच्या सहकार्याने मागील हंगामात चांगले गाळप आपण केले. जिल्ह्यात सर्वाधिक रिकव्हरी गणेश कारखाना करू शकला.श्री गणेश कारखाना हा अनेक अडचणींना तोंड देत पुढे जातो आहे. आपल्याला राजकारण विरहित या कामधेनूला टिकवायचे हा आमचा उद्देश आहे.आ.बाळासाहेब थोरात आणि बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संकटाना आपण तोंड दिले आहे. कारखान्याला अडचण व्हावी म्हणून काही लोक कारखान्याला कर्ज मिळण्यासाठी आडकाठी आनत होते त्यावरही आपण मात केली आहे.सर्वांच्या सहकार्याने येणाऱ्या हंगामात अधिक चांगले उद्दिष्ट गाठू असे विवेकभैय्या कोल्हे याप्रसंगी म्हणाले.

कारखाना चालवताना अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते.चाळीस कोटींचे कर्ज जिल्हा बँकेच्या माध्यमातून आपल्याला मिळविताना अनेक प्रकारचा राजकीय त्रास देण्याचा प्रयत्न झाला.अद्यापही अनेक ठिकाणी केसेस करून कारखान्याचे अहित पाहणारी मंडळी त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र त्यावर कशी मात करायची ते आपण करू.कर्मचारी एकजूट ठेवत येणारा हंगाम जोमाने पार करून कारखाना कसा प्रगतीकडे घेऊन जाता येईल यासाठी आम्ही सोबत आहोत तुम्ही जिद्दीने आजपासून या हंगामाची सुरुवात रोलर पूजन करून झाली आता मोठे उद्दिष्ट ठेऊन पावले टाकण्याचा श्री गणेशा करा असे कोल्हे शेवटी म्हणाले.

या प्रसंगी चेअरमन सुधीर लहारे, व्हा.चेअरमन विजय दंडवते,सर्व संचालक मंडळ, संगमनेर सह.साखर कारखान्याचे एम.डी. घुगरकर साहेब,माजी संचालक ज्येष्ठ नेते गंगाधर पा. चौधरी,चंद्रभान धनवटे,माजी संचालक संजय सरोदे,रामचंद्रदादा बोठे,नारायणराव काकड,डॉ.वसंत लबडे,बी.एल.आहेर सर,सखाराम पाटील चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here