श्री.जनार्दन स्वामी रुग्णालय आणि ब्राह्मणसभा संयुक्त विदयमाने मोफत सर्व रोगनिदान शिबिर

0

कोपरगाव : कोपरगांव येथील ब्राह्मण सभेच्या ४१वर्धापन दिनाच्या निमित्तानं ब्राह्मण सभा,कोपरगांव आणि श्री.जनार्दन स्वामी हॉस्पीटल यांच्या संयुक्त विदयमाने कोपरगांव शहरातील सर्व नागरीकांसाठी सर्व रोग निदान शिबिर शनिवार दिनांक २५ फेब्रुवारी रोजी ब्राह्मण सभा मंगल कार्यालय,श्रीराम नगर कोपरगांव येथे सकाळी ९.०० वा.पासून ते दुपारी १ वा.पर्यत आयोजित केले आहे अशी माहीती एस.जे.एस.हॉस्पीटलचे कार्यकारी संचालक प्रसाद चांगदेव कातकडे आणि ब्राह्मण सभेचे सचिव सचिन देविदास महाजन यांनी दीली आहे.
या शिबिरांमध्ये बी.पी,शुगर,२ डी ई को,ईसीजी इ.तपासणी करण्यात येणार असुन गरजुना मोफत औषधे वितरीत केली जाणार आहे. या शिबिरात अनुभवी तज्ञ डॉक्टर प्राचार्य यांचे मार्गदर्शन व सल्ला आणि आवश्यकता भासल्यास मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तरी या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त नागरीकांनी घ्यावा असे आवाहन ब्राम्हण सभा,कोपरगांव आणि श्री.जनार्दन स्वामी हॉस्पीटल यांच्यावतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here