पोहेगांव प्रतिनिधी : श्री साई राघवेश्वर प्रतिष्ठान, कुंभारी आयोजित भव्य पायी पालखी सोहळा गेल्या पंधरा वे वर्षा पासून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याही वर्षी मोठ्या उत्साहात आनंदाने कुंभारी येथून श्री साई पालखी शिर्डीला गेली होती. या वेळी सुरुवातीला पालखीचे पूजन परमपूज्य राघवेश्वरानंदगिरीजी महाराज व श्री कैलाश गिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. साईबाबांची आरती होऊन साईंची पालखीचे प्रस्थान झाले. यांनी साईच्या प्रतिमेचे पूजन करून आशीर्वाद घेतला.
पालखी मार्गस्त असताना पालखी सोहळ्याचे फोटो शूटिंग करण्यात आले. कुंभारी पासून कोपरगाव पर्यंत पायी जाणाऱ्या भाविकांसाठी पालखी मार्गावरती नितीन सांगळे यांच्या टँकरने पाणी मारण्यात आले. धारणगाव येथील विठ्ठल मंदिर येथे पालखीचे पूजन करण्यात आले तसेच नितीन चौधरी यांचे वस्तीवर भाविकांसाठी पाणी आणि सरबताची व्यवस्था करण्यात आली होती. नरोडे वस्ती येथे कल्पेश नरोडे यांच्या वतीने पाणी कोल्ड्रिंक्स देण्यात आली,जेऊर पाटोदा येथे वाल्मीक कारभारी केकान यांच्या वस्तीवर पालखीचे पूजन तसेच भाविकांना चहा, नाश्ता, पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती. कोपरगाव येथील नागरे पेट्रोल पंप वरती श्री संजयजी नागरे सौ वनिताताई नागरे,समीरजी नागरे व श्री किरण पैलवान यांच्या हस्ते पालखीची पूजा करण्यात आली व पालखीला देणगी दिली .
संत जनार्दन स्वामी आश्रम मध्ये परमपूज्य रमेश गिरीजी महाराज यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले , ओम गुरुदेव पेट्रोलियम येथे पालखीचे पुजन श्री रामचंद्र जाधव साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. व याठिकाणी सर्व भाविकांनी महाप्रसादाचे सेवन केले. व नागरे परिवाराकडून पालखीला देणगी देण्यात आली. पालखीमध्ये आलेल्या भाविका कुंभारी, माहेगाव देशमुख, धारणगाव येथील भाविकांनी साईबाबांचे दर्शन घेतले. व भाविकांना परत आपल्या घरी सुखरूप पोहचवण्यासाठी प्रतिष्ठानच्या वतीने व्यवस्था करण्यात आली होती, या मध्ये कुंभारी, माहेगाव देशमुख, धारणगाव येथील भाविकांचे ट्रॅक्टर्स, पिकप, छोटा हत्ती, रेनबो स्कूलच्या बसेस देण्यात आलेल्या होत्या. श्री साई राघवेशवर प्रतिष्ठान वर्षभरात अनेक उपक्रम राबवत असते त्यामधे प्रमुखाने रक्तदान शिबिर असेल सर्व रोग निदान शिबिर, वृक्षारोपणाचा कार्यक्रम असेल अनेक उपक्रम श्री साई राघवेशवर प्रतिष्ठान मार्फत गावामधे राबवण्यात येतात. या सर्वच कार्यक्रमासाठी गावातील तरुणांचा मोठा सहभाग असतो. या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने श्री हनुमान जयंती च्या पर्वावर परमपूज्य राघवेशवर नंदगिरी महाराज यांच्या उपस्थित भांडारा आयोजित केला आहेत, या कार्यक्रमासाठी प्रतिष्ठानच्या वतीने पंचकृशितील सर्व भाविकांना निमंत्रण देण्यात येत आहे.