कोपरगाव : येथील सोमैया विद्याविहार संचलित,श्री शारदा इंग्लिश मिडियम स्कूल कोपरगाव,अहमदनगर. विद्यालयाचा शासकीय चित्रकला *इंटरमिजिएट * ग्रेड परीक्षा २०२३ चा निकाल *१००% लागला असून या परीक्षेत बसलेल्या विद्यालयातील सर्वचे सर्व विद्यार्थी चांगल्या श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती देताना विद्यालयाचे प्राचार्य के.एल.वाकचौरे यांनी सांगितले की *इंटरमिजिएट परीक्षेस विद्यालयातील एकूण १४८* विद्यार्थी प्रविष्ट झालेले होते. त्यापैकी सर्वच्या सर्व विद्यार्थी चांगल्या श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांनी इंटरमिजिएट परीक्षेत घवघवीत यश संपादन करून दैदिप्यमान निकालाची परंपरा कायम राखली आहे.
परीक्षेचा निकाल खालील प्रमाणे- ग्रेड-A – ११* *विद्यार्थी , ग्रेड -B – १५ विद्यार्थी ,ग्रेड-C, – १२२ विद्यार्थी
.परीक्षेस प्रविष्ट सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे कला शिक्षक मंगेश गायकवाड यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले . सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे माननीय मुख्याध्यापक के.एल.वाकचौरे सर, उपमुख्याधिका सौ.अमृतकर मॅडम, पर्यवेक्षिका सौ.पहाडे मॅडम,सौ. ससाणे मॅडम,के.जी.प्रमुख सौ. फर्नांडिस मॅडम,सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले….