श्री संत जगनाडे महाराज ट्रस्टची सामाजिक बांधिलकी आदर्शवत – आ.आशुतोष काळे

0

कोळपेवाडी वार्ताहर :- समाजातील रंजल्या-गांजल्या लोकांचे अश्रू पुसून त्यांना आधार देवून त्यांच्या  जीवनातील वेदना, दु:ख कमी करण्याचे काम श्री संत जगनाडे महाराज बहुउद्देशीय सेवाभावी ट्रस्टने सातत्याने केले असून त्यांची हि सामाजिक बांधिलकी आदर्शवत असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.

कोपरगाव येथे श्री संत जगनाडे महाराज बहुउद्देशीय सेवाभावी ट्रस्ट व अ.नगर जिल्हा तिळवण तेली समाजाच्या वतीने विविध शालांत परीक्षा तसेच स्पर्धा परीक्षेत नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा नुकताच आ.आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.याप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले की, श्री संत जगनाडे महाराज बहुउद्देशीय सेवाभावी ट्रस्ट नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतो. त्या माध्यमातून ट्रस्टने हळदी कुंकू-कार्यक्रम, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, उपचारासाठी गरजू रुग्णांना आर्थिक मदत असे अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून दरवर्षी गुणवंतांचा देखील आवर्जून गौरव करतात त्यामुळे या गुणवंतांना निश्चितपणे प्रेरणा मिळणार असून समाजाचे नाव मोठे होणार आहे. यामध्ये श्री संत जगनाडे महाराज बहुउद्देशीय सेवाभावी ट्रस्ट व अ.नगर जिल्हा तिळवण तेली समाजाचा मोठा वाटा राहणार आहे. तिळवण तेली समाज नेहमीच काळे परिवाराच्या सोबत राहिला आहे. काळे परिवाराने देखील तिळवण तेली समाजाच्या समस्या, अडचणी सोडविल्या असून यापुढेही समाजाच्या पाठीशी उभा राहून प्राधान्याने अडचणी सोडवणार असल्याची ग्वाही आ.आशुतोष काळे यांनी यावेळी दिली.  

यावेळी सुधाकर कवाडे, पुरुषोत्तम सर्जे, रवी कर्पे, बाळासाहेब लूटे, भागवत लुटे, बंडूशेठ क्षीरसागर, जगन्नाथ गाडेकर, प्रदीप कर्पे, आसाराम शेजुळ, श्री संत जगनाडे महाराज बहुउद्देशीय सेवाभावी ट्रस्टचे अध्यक्ष, रमेश गवळी, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर लोखंडे, सचिव सुमित सोनवणे, संचालक विलास वालझाडे, राजेंद्र लक्ष्मण राऊत, राजेंद्र रघुनाथ राऊत, राजेश वालझाडे, अमोल महापुरे, गोरख देवडे, रविंद्र राऊत, प्रमोद कवाडे, गणेश सोनवणे, राजेंद्र सोनवणे, भगवान आंबेकर, संतोष सोनवणे, काशिनाथ चौधरी आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते व समाजबांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here