कोपरगाव- रयत शिक्षण संस्था ही आशिया खंडातील सर्वात मोठी व नावाजलेली संस्था आहे. या संस्थेची स्थापना करणारे पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म २२ सप्टेंबर १८८७ रोजी झाला. त्यांच्या कार्याचे स्मरण व त्यांच्या विषयीची कृतज्ञ जाणीव जागृत ठेवण्याच्या भूमिकेतून संपूर्ण महाराष्ट्रभर ‘कर्मवीर जयंती’ साजरी केली जाते. यानुसार कर्मवीरांची १३६ वी जयंती येथील एस.एस.जी.एम. महाविद्यालयात विविध उपक्रमांनी बुधवार दिनांक २७ सप्टेंबर २०२३ रोजी साजरी होत आहे. या समारंभासाठी प्रख्यात वात्रटिकाकार आणि चित्रपट लेखक,दिग्दर्शक रामदास फुटाणे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालय विकास समितीचे
चेअरमन आणि रयत शिक्षण संस्थेचे व्हा.चेअरमन ॲड. भगीरथकाका शिंदे भूषविणार आहेत. तसेच महाविद्यालय विकास समितीचे सर्व पदाधिकारी यांच्या विशेष उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होत आहे.
कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री सदगुरू गंगागीर महाराज महाविद्यालय, कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालय, पद्मा मेहता प्राथमिक कन्या विद्यालय, सी.एम. मेहता माध्यमिक कन्या विद्यालय व कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक आणि तांत्रिक विद्यालय या पाचही शाखा मिळून संपन्न होणार आहे.तरी या
कार्यक्रमासाठी रयतप्रेमी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. आर. आर. सानप यांनी केले आहे.