श्री समर्थ बाबुराव पाटील महाराज यात्रा उत्सवात मोठी गर्दी

0

समर्थ केसरी गदेचा मानकरी अहिल्यानगरचा ऋषीकेश लांडगे ; नागरीकांनी लुटला मनमुराद आनंद 

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी 

              दिल्ली-अजमेर येथील आकर्षक रहाट पाळणे, फटाक्यांची आतिषबाजी, खरेदीसाठी लहान व मुले व महिलांची लगबग , खाऊ गल्लीतील गर्दी, दर्शनासाठी भाविकांच्या मंदिर परिसरात लागलेल्या रांगा, प्रचंड उत्साहपूर्ण वातावरणात राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील सर्वधर्मियांचे श्रध्दास्थान श्री समर्थ बाबुराव पाटील महाराज यात्राउत्सव संपन्न झाला. यंदा गर्दीचा मोठा उच्चांक  पाहावयास मिळाला.

           

दरवर्षीप्रमाणे यात्रा कमिटीने केलेल्या अचूक नियोजनामुळे यंदाचीहि यात्रा उत्साहात पार पडली. यानिमित्ताने पालखी पूजन महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आ.हेमंत ओगले, जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे आदिंसह मान्यवर उपस्थित होते.  वैजापूर, नाशिक, बारामती येथील ब्रास बॅण्ड पथकांच्या जुगलबंदीने सर्वांचे मनोरंजन केले. संगमनेर, वांबोरी व बेलापूर येथील रोषणाईकारांनी साकारलेल्या डिजिटल फटाक्यांच्या मनमोहक आविष्काराने सर्वांची मने जिंकली. कुस्त्याचा हंगामा आखाड्यात जवळपास ६० मल्लांनी हजेरी लावली. यावेळी अहिल्यानगर येथील ऋषीकेश लांडगे प्रथम विजेता होऊन समर्थ केसरी गदेचा मानकरी ठरला. तर हरियाणा राज्यातील नविनसिंग मोअर या मल्लाला  उपविजेता म्हणून बहुमान मिळाला. उत्सवनिमित्ताने रहाट पाळण्यात बसून आनंद घेण्यासाठी  व खरेदीसाठी देवळाली प्रवरा व परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

       

 “पाहुण तुमच्यासाठी काय पण” या लावण्याच्या कार्यक्रमाचा आनंद सर्वांनीच घेतला. हा कार्यक्रम पाहण्यासाठी शहरातील महिलांनी मोठी गर्दी केली होती. लावण्यवतींच्या नृत्यास भरभरुन दाद देण्यात आली.

       यात्रेसाठी राहुरी महसूल, पोलीस, देवळाली प्रवरा नगरपरिषद, होमगार्ड, पोलीस मित्र, विविध सामाजिक संघटना, शैक्षणिक व सामाजिक संस्था तसेच देणगीदार व दानशूर मंडळी व शहरवासियांचे सहकार्य लाभले. यात्रा यशस्वीतेसाठी अध्यक्ष डॉ.विश्वास पाटील, वंशज संजय पाटील, कार्याध्यक्ष शुभम पाटील,नारायण कडू,गणेश  भांड, तुळशीराम कडू,सतीश वांळुज,अनिल  ढुस, धनंजय शिंदे,भारत शेटे, सुखदेव होले, शिवराम कडू, बापू कडू, संदिप कडू, राजेंद्र पोकळे, मुस्ताक शेख, सचिन सरोदे, रंगनाथ  होले,अशोक शिंदे, यश धाकतोडे आदिंसह सदस्यांनी परिश्रम घेतले. राहुरी पोलिस ठाण्याचे  पोलिस उपनिरीक्षक धर्मराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस व होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here