संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने पोहेगांव येथे नेत्र तपासणी शिबिर संपन्न.. 22 रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियासाठी निवड

0

सोनेवाडी ( वार्ताहर) : कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे काल श्री मयुरेश्वर गणपती मंदिरात संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मयुरेश्वर गणपती मंदिर ट्रस्ट , तुळशी आय हॉस्पिटल नाशिक व कोपरगाव व्हिजन सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने काल दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. यावेळी शिबिराचे आयोजक कैलास भड, डॉक्टर साहिल पटेल,  राजेंद्र औताडे, कॉन्ट्रॅक्टर पंकज जोंधळे,आप्पासाहेब औताडे ,विलास रोहमारे, विनोद रोहमारे, दीपक रोहमारे, बाळासाहेब रोहमारे, विठ्ठल औताडे, बाबासाहेब रोहमारे, कैलास शिरसाट वाल्मीक महाले, शिवाजी महाले, रमेश औताडे ,निखिल औताडे, संजय वाघ, निवृत्ती भालेराव अदी उपस्थित होते.शिबिरामध्ये 84 रुग्णांची नेत्र तपासणी डॉक्टर साहिल पटेल यांनी केली. 22 रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया निवड करण्यात आली. रुग्णांची ही मोतीबिंदू शस्त्रक्रिया नाशिक येथील तुळशी आय हॉस्पिटल येथे होणार आहे.संकष्टी चतुर्थी निमित्त आलेल्या भाविकांना शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते व शिवाजी पंढरीनाथ महाले यांनी उपलब्ध करून दिलेले खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन आप्पासाहेब औताडे यांनी केले तर आभार राजेंद्र औताडे यांनी मांडले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here