संगमनेरात महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला ; एकाला अटक

0

संगमनेर : संगमनेर शहरातील मालपाणी हॉस्पिटल जवळील बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम फोडण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांपैकी एकाला ताब्यात घेण्यात शहर पोलिसांना यश आले. तर अन्य एक जण पसार झाला. 

        शुक्रवारी रात्री १ वाजेच्या सुमारास सदरची घटना घडली. दोघांनी टॉमीच्या सहाय्याने एटीएमचा पत्रा वाकवून एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, मॉनिटरिंग सेन्सर यंत्रणेच्या माध्यमातून चोरी होत असल्याचे निदर्शनास येताच तेथील कर्मचाऱ्यांनी बँक मॅनेजर व शहर पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. यावेळी मंगेश बाळू गांगुर्डे (वय २०, रा चास, तालुका अकोले) याला एटीएममध्ये असताना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर अन्य एक पोलिसांना पाहून पसार होण्यात यशस्वी झाला. बँक मॅनेजर अक्षय संजय जवरे (वय २९, गणेशनगर गल्ली नं-१४, संगमनेर) यांच्या फिर्यादीवरून मंगेश बाळू गांगुर्डे व त्याचा साथीदार (अनोळखी) या दोघांवर शहर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक निवांत जाधव करीत आहेत. दरम्यान शहरात चोऱ्यांचे सत्र सुरूच असून त्यांचा शोध लावण्यात पोलिस अपयशी ठरत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी उपनगरात रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here