संगमनेर : जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी किशोर कदम आणि संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांच्या मार्गदर्शनाखाली व नायब तहसीलदार उमाकांत कडनोर यांच्या अध्यक्षतेखाली संगमनेर तहसील कार्यालयात २४ डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य संगमनेरचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर राक्षे हे होते तसेच ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य संगमनेरचे तालुका सचिव कारभारी देव्हारे, कायदेशीर सल्लागार श्री.गोडसे, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे विनायक वाडेकर, दिनेश थोरात, वजनमापे निरीक्षक श्री.फटांगरे, संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले व संगमनेर तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार, ग्राहक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून व मान्यवरांचा सत्कार करून करण्यात आली. या कार्यक्रमात कारभारी देव्हारे श्री.गोडसे,विनायक वाडेकर, श्री.फटांगरे, नायब तहसीलदार उमाकांत कडनोर यांनी आपले मनोगत व्यक्त केले, व ग्राहक संरक्षण कायद्याची माहिती उपस्थिंताना दिली. त्याचप्रमाणे ग्राहकांच्या हक्काबाबत जागरूक रहाणेबाबत मार्गदर्शन केले. उपस्थित ग्राहकांनी गॅस एजन्सी व महावितरण बाबत आपल्या तक्रारी मांडल्या त्यावर उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या शंकाचे निरसन केले व चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरवठा विभागाचे सुनिल दुर्गुळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यात पुरवठा विभागाचे गणेश भालेराव, मारुती गंभिरे, सोपान वाकचौरे, स्वप्नील पडवळ यांनी विशेष परिश्रम घेतले.