घुलेवाडीत अपक्ष महिला उमेदवाराने परिवर्तन घडवले
संगमनेर : चंद्रकांत शिंदे पाटील
अत्यंत चुरशीच्या झालेल्या तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या मतदानानंतर काल झालेल्या मतमोजणीत काँग्रेसचे वरिष्ठ नेते, माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या गटाचे सर्वाधिक २७ ग्रामपंचायतीवर सरपंच पदाचे उमेदवार विजयी झाले असून त्या खालोखाल राज्याचे विद्यमान महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाच्या नऊ सरपंचांनी घवघवीत यश संपादन केले आहे. तालुक्यात अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या घुलेवाडी ग्रामपंचायतीत मात्र थोरात गटाला पराभवाचा धक्का बसला असून येथे अपक्ष निर्मला कैलास राऊत या महिला उमेदवाराने “हम भी कम नही” म्हणत गाव कारभारीन होण्याचा मान पटकावत परिवर्तन घडवले आहे.प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख, इंदोरीकर यांच्या सासुबाईने निळवंडे ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधी गटाच्या उमेदवाराला आस्मान दाखवत थोरात गटाकडून गाव कारभारीन होण्याचा मान पटकावला आहे.
रविवार दिनांक १८ डिसेंबर रोजी तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतीसाठी उत्स्फूर्तपणे मतदान झाले होते. तालुक्यातील अनेक गावात माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांना मानणाऱ्या वेगवेगळ्या दोन गटातच लढती झाल्या होत्या तर काही ठिकाणी थोरात विरुद्ध विखे गटात निवडणुकीचे घामासान पाहायला मिळाले होते. अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत कोण बाजी मारेल हे सांगणे अवघड बनले होते. ३७ ग्रामपंचायती पैकी सायखिंडी आणि डोळासने येथील थोरात गटाचे सरपंच पदाचे उमेदवार अर्ज माघारीच्या दिवशीच बिनविरोध निवडून आले होते तसेच ३६७ सदस्या पैकी ७३ सदस्य थोरात व विखे या दोन्ही गटाचे अर्ज माघारीच्या दिवशीच बिनविरोध झाले होते. त्यामुळे सरपंचपदाच्या ३५ तर सदस्य पदाच्या २९४ जागांसाठी रविवारी मतदान पार पडले त्याची मतमोजणी काल मंगळवारी
शहरातील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अमोल निकम यांच्या नेतृत्वात सकाळी दहा वाजता सुरू झाली. या मतमोजणीच्या नऊ फेऱ्या करण्यात आल्या. अंतिम निकाल आला असता बलाढ्य उमेदवारांना पराभवाची धूळ चाखावी लागल्याचे चित्र स्पष्ट झाले. तालुक्यातील जोर्वे, निमोण, तळेगाव दिघे, कोल्हेवाडी, रहिमपूर, कनकापूर आदी महत्त्वाच्या नऊ गावात अटीतटीच्या लढतीत विखे गटाचे सरपंच पदाचे उमेदवार निवडून आले असून थोरात गटाने ही विखेंच्या ताब्यात असणाऱ्या निमगाव जाळी,उबंरी बाळापूर ग्रामपंचायतीवर शेतकरी विकास मंडळाचा झेंडा फडकावला आहे. तालुक्यात अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या घुलेवाडी ग्रामपंचायतीत थोरात गटाच्या उमेदवाराला धूळ चारत अपक्ष निर्मला कैलास राऊत या महिलेने परिवर्तन घडवत गत निवडणुकीत लोकनियुक्त सरपंच म्हणून विजयी झालेल्या चुलत सासर्यावर अविश्वास ठराव आणून सरपंच पदावरून पायउतार होण्यास भाग पाडणाऱ्या तथाकथित गाव पुढार्यांना धडा शिकवीत अपमानाचा बदला घेत गाव कारभारीन होण्याचा मान पटकावला आहे.
निवडणुका झालेल्या सर्वच गावात सत्ताधारी आणि विरोधकांचे सदस्य निवडून आले असून माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या जोर्वे गावात विखे गटाच्या प्रीती गोकुळ दिघे या सरपंचपदी निवडून आल्या असून त्यांच्या गटाचे तीन सदस्य विजयी झाले आहेत इतर नऊ सदस्य थोरात गटाचे निवडून आले आहेत. निमोण मध्ये विखे गटाचे संदीप भास्करराव देशमुख कोल्हेवाडीत सुवर्णा राहुल दिघे
तळेगाव दिघे उषा रमेश दिघे या विखे गटाच्या सरपंच पदाच्या उमेदवारांनी प्रतिस्पर्धी उमेदवारावर मात करत विजय संपादन केला त्याचबरोबर निमगाव जाळीत थोरात गटाच्या राजहंस दूध संघाच्या संचालिका प्रतिभा सोमनाथ जोंधळे यांनी विखे गटाच्या उमेदवाराचा दणदणीत पराभव केला. उंबरी बाळापुर मध्ये थोरात गटाच्या अर्चना सुभाष भुसाळ यांनी प्रतिस्पर्धी विखे गटाच्या उमेदवाराला धूळ चारत या ग्रामपंचायतीवर शेतकरी विकास मंडळाचा झेंडा फडकवला. विजयी झालेले उमेदवार पुढील प्रमाणे- पिंपरणे- सरपंच नारायण सिताराम मरभळ (९०३), सदस्य धनंजय सदाशिव वाकचौरे, उत्तम विश्वनाथ राहींज, कोमल नवनाथ मरभळ, मिनीनाथ बबन जोर्वेकर, अर्चना सुधीर रोहम, रंजना निलेश चत्तर, श्रीकांत गौतम बागुल, विद्या गोकुळ काळे, बाळासाहेब गंगा निकम, शैला मंजाबापू साळवे, पल्लवी प्रशांत देशमुख, ओझर खुर्द – सरपंच गिरीजा अण्णासाहेब साबळे (७११), सदस्य सुंदरनाथ चंद्रभान शेजुळ, दगडू काशिनाथ शेपाळ, शुभांगी अरुण कदम, बकुनाथ दत्तू साबळे, चांदणी दिलीप कदम, कविता शिवाजी शिंदे, गंगाधर खंडू थोरात, विजया अशोक गायकवाड, कल्पना बाळासाहेब वर्पे, निमोण – सरपंच संदीप भास्करराव देशमुख (२१८९), सदस्य रामकृष्ण निवृत्ती गाडेकर, सोनाली प्रवीण गलांडे, भाऊसाहेब पांडुरंग घुगे, द्रोपदा बबन विंचू, मंदा भास्कर कराड, सुरज सुदाम गायकवाड, सीताबाई पुंजाराम मंडलिक, सुमन रघुनाथ घुगे, संतोष विश्वनाथ घुगे, मुस्तकीम अकील शेख, मोहिनी विश्वनाथ मोकळ, अंभोरे – सरपंच सुरेखा भाऊसाहेब खेमनर (१६२७) सदस्य किसनराव सोपान खेमनर, रूपाली गोरक्ष कदम, सुमन महादू सोर, नंदा माणिक पवार, प्रियांका अण्णासाहेब जगनर, भाऊसाहेब रखमा खेमनर, सदाशिव किसन खेमनर, शितल संदीप कोटकर, नारायण सहादू खेमनर, संपत गोविंद खेमनर, शांता नितीन खेमनर, हंगेवाडी – सरपंच कमल राजेंद्र कांगणे (५३७), सदस्य नितीन सोमनाथ सांगळे, इंदुबाई इंद्रभान केकाण, योगिता योगेश कांगणे, संतोष लहानू कांगणे, कलाबाई विश्वनाथ पवार, नंदू सुखदेव घुगे, मीराबाई गहिनीनाथ सांगळे, कनकापूर – सरपंच ज्योती अंकुश पचपिंड, सदस्य लहानु कारभारी शिंदे, मंगल बन्सी मोरे, आशा बाबुराव शिंदे, बंडू साहेबराव मोरे, अस्मिता जगदीश शिंदे, राधाकिसन जिजाबापू चौधरी, संगीता सुखदेव पचपिंड, निंबाळे- सरपंच भागीरथाबाई माधव काठे(५४३), सदस्य खतीब बाबू शेख, कमल लहानू गायकवाड, शहाजान वसीम शेख, इर्षा सर्जेराव पबेॅत, सचिन दगडू पबेॅत, संपत मधुकर पबेॅत, संगीता दत्तात्रय पबेॅत, वडझरी बुद्रुक -सरपंच संध्या संदीप गोर्डे (७०१), सदस्य रवींद्र नवनाथ गोडेॅ, शकुंतला रामनाथ कांदळकर, सुनिता संपत गोडेॅ, ठकाजी सूर्यभान बोडखे, ताराबाई राजू जगताप, संजय रामनाथ गायकवाड, अनिता गणपत गोडेॅ, कोळवाडे -सरपंच पुष्पा योगेश गुंजाळ (६२२), सदस्य रूपाली दत्तू नेहे, सुनिता मधुकर गोंधे, बाबुराव जानकु गोंधे, रामा सगा मडके, सिंधू राजेंद्र काळे, भाग्यश्री शिवराम घोडे, मंगल अशोक कुदळ, विलास मुरलीधर गुंजाळ, दत्तात्रय हरिभाऊ तारडे, जांभुळवाडी- सरपंच शांताबाई अण्णासाहेब कुदनर (८१३), सदस्य भाऊसाहेब पुंजा सोन्नर, सुवणाॅ सावळेराम कोळेकर, सुनंदा निवृत्ती डोंगरे, प्रवीण दगडू खेमनर, कोंडाजी कारभारी खेमनर, अनिता देवराम खेमनर, विठ्ठल झुंबरु खेमनर, मिराबाई सोपान खेमनर, देवबाई त्रिंबक खेमनर, रणखांबवाडी- सरपंच बाबाजी मल्हारी गुळवे (५३५), सदस्य हौशीराम कुशाबा खेमनर, शैला पिंटू जाधव, इंदुबाई रेवजी जाधव, प्रशांत राजेंद्र गुळवे, विठाबाई दामू जाधव, उल्हास काशिनाथ गुळवे, आकांक्षा दिलीप वाजगे, पोखरी हवेली -सरपंच सुदाम गोरख खैरे (७१८), सदस्य पोपट सखाराम खैरे, सोमनाथ महिपती थिटमे, अलका सोपान दये, कार्तिक विनोद ठोंबरे, अबई काशिनाथ गायकवाड, सुशीला तुकाराम गवांदे, महेश अण्णासाहेब उदमले, झेलमबाई रमेश खुळे, निमगाव भोजापूर -सरपंच ज्योती मच्छिंद्र कडलग (६४७), सदस्य प्रमोद शिवनाथ कडलग, अश्विनी अनिल कडलग, रूपाली दीपक वाळुंज, दत्तात्रय केशव गुंजाळ, दिग्विजय रामनाथ फटांगरे, सरला संतोष कडलग, प्रशांत राजेंद्र कडलग, रूपाली भगवान कडलग, छबुबाई भरत मोहिते, कोल्हेवाडी- सरपंच सुवर्णा राहुल दिघे (२०३५), सदस्य इंद्रभान चांगदेव दिघे, काशिनाथ मुरलीधर वामन, सुनीता बाळासाहेब दिघे, मोहन कोंडाजी वामन, शांताबाई काळू खैरे, मंगल भानुदास कोल्हे, काशिनाथ अंबू आरगडे, भारती दत्तात्रय कोल्हे, जालिंदर बाळकृष्ण दिघे, सविता भाऊसाहेब बलसाने, धनंजय शांताराम खुळे, परिघाबाई बाबासाहेब खुळे, मनीषा मधुकर खुळे, वडझरी बुद्रुक -सरपंच पांडुरंग कारभारी सुपेकर (४२१), सदस्य मच्छिंद्र चंद्रभान सुपेकर, उषा सुभाष भडांगे, सुनिता तानाजी सुपेकर, अमोल यादव सुपेकर, प्रियंका संदीप सुपेकर, तानाजी भानुदास सुपेकर, शोभा अशोक राऊत, मालुंजे- सरपंच सुवर्णा संदीप घुगे (१०२७), सदस्य अनिल कारभारी आव्हाड, दिपाली संतोष खरात, मिराबाई धोंडीबा घुगे, शेखर शिवाजी सोसे, प्रदीप भाऊसाहेब घुगे, सरूबाई नामदेव आव्हाड, दत्तू दादा खरात, रवीना सोमनाथ खरात, सखुबाई ज्ञानदेव डोंगरे, जोर्वे -सरपंच प्रीती गोकुळ दिघे (१८६०), सदस्य बादशहा रामकृष्ण बोरकर, संदीप नारायण काकड, सुनिता बाळासाहेब दिघे, दिगंबर नामदेव इंगळे, पूनम किरण बर्डे, संगीता राजेंद्र थोरात, किसन हिरामण खैरे, मंगल विलास काकड, हौशीराम लहानू दिघे, लक्ष्मी संपत राक्षे, रवींद्र बबन वाकचौरे, सुवर्णा योगेश जोर्वेकर, मिराबाई नानासाहेब जोर्वेकर,
साकुर- सरपंच सचिन दिनकर सोनवणे (३५२५), सदस्य सुनील निवृत्ती भुजबळ, शोभा महेंद्र केदार, तुकाराम साहेबराव पवार, शंकरराव हनुमंता खेमनर, लिलाबाई दत्तू चितळकर, चांगदेव भागाजी खेमनर, सुवर्णा एकनाथ केदार, हजराबी लतीफ पटेल, दादा अब्दुल पटेल, उर्मिला सचिन कातोरे, शोभा बाळू डोखे, राजेंद्र भिवाजी सोनवणे, रमेश मधुकर पेंडभाजे, सविता दीपक फिरोदिया, निसार अब्दुल पटेल, स्वाती शांताराम गाडेकर, शैला कैलास टेकुडे, करुले -सरपंच बाळासाहेब रावसाहेब आहेर (६१२), सदस्य साहेबराव दादा गायकवाड, सुमन बाळासाहेब कांदळकर, शैला अनिल बोऱ्हाडे, अशोक भिमाजी तुपसुंदर, कैलास बाळासाहेब आहेर, वंदना नानासाहेब आहेर, सखुबाई गंगाराम गायकवाड, जालिंदर भगवान आखाडे, मुमताज आरिफ पठाण, सादतपूर -सरपंच नारायण निवृत्ती गुंजाळ (५३२), सदस्य सरिता रावसाहेब मगर, लताबाई सुभाष मगर, सागर बाळासाहेब कडलग, कल्याणी प्रवीण कडलग, शुभम नवनाथ काळे, दिलीप संपत मगर, जया शामराव मगर, रहिमपूर- सरपंच सविता लक्ष्मण शिंदे (१००५), सदस्य संजय केशव खुळे, गजानन लहान शिंदे, पुष्पा संभाजी गुळवे, सुभाष रंगनाथ वाळुंज, योगिता गणेश गुळवे, सविता संदीप शिंदे, राहुल अशोक गुळवे, लहानबाई शिवाजी मोरे, मीनाक्षी शरद शिंदे, तळेगाव दिघे – सरपंच उषा रमेश दिघे (२६६७), सदस्य जालिंदर नवनाथ दिघे, शोभा मनोहर कांदळकर, कुसुंब बबन दिघे, बाळू साहेबराव दिघे, मंदाबाई रघुनाथ इल्हे, दिपाली मीननाथ दिघे, अतुल दामू कदम, आबासाहेब तात्याबा भागवत, कोमल राहुल जगताप, मयूर नवनाथ दिघे, दुर्गा राजेश दिघे, सुरेखा सुभाष जगताप, धनंजय जनार्दन इल्हे, भाऊसाहेब बाळासाहेब दिघे, कुसुम प्रकाश दिघे, डोळसणे -सरपंच मंगल बाळासाहेब काकड (बिनविरोध), सदस्य रवींद्र लक्ष्मण लोहकरे, संगीता नंदकुमार बांबळे, मारुती बोल्हाजी बांबळे, नंदा बाळासाहेब काकड, संतोष लक्ष्मण क्षिरसागर, जमुना गणपत मते, विमल नाना मिसाळ, संतोष रघुनाथ धुमाळ, सीताबाई अभिमन्यू सूर्यवंशी, धांदळफळ बुद्रुक- सरपंच उज्वला नवनाथ देशमाने (२४००), सदस्य संकेत अशोक वलवे, दिपाली विश्वनाथ वाकचौरे, रंजना भास्कर मेहेत्रे, भारत किसन कोल्हे, जयराम विश्वनाथ दिवटे, सुरेखा बाळू तोरकडी, अतुल किसन देशमुख, अक्षदा प्रभाकर डेरे, जयदेव विष्णू डेरे, वंदना संजय कवडे, पोपट रघुनाथ वाकचौरे, भारती संजय भोपळे, संगीता राजू गायकवाड, धांदरफळ खुर्द -सरपंच लता भास्कर खताळ (११६०), सदस्य नाना हरिभाऊ बर्डे, संगीता सोपान खताळ, शरद दादासाहेब कोकणे, विमल बाबासाहेब जाधव, सुनीता देवराम गुंजाळ, राजेंद्र विठ्ठल खताळ, संदीप विठ्ठल ठोंबरे, संगीता पोपटराव खताळ, बाळू शिवाजी मस्कुले, संगीता संभाजी गोडसे, प्रतिभा संजय खताळ, घुलेवाडी- सरपंच निर्मला कैलास राऊत (३३१२), सदस्य चंद्रकांत निवृत्ती क्षीरसागर, दत्तात्रय चिमण राऊत, शैला बाळासाहेब पानसरे, बाजीराव लक्ष्मण पानसरे, सोनाली रवींद्र गिरी, प्रतिभा प्रदीप ढमाले, अनिल किसन राऊत, माया दिलीप पराड, अनिल बबन राऊत, पल्लवी अविनाश त्रिभुवन, सुनील दगडू रोकडे, आरती नानासाहेब मालुंजकर, शितल विलास राऊत, निलेश बादशहा सातपुते, कोमल विजय अवचिते, सविता संदीप पावबाके, निमगाव जाळी -सरपंच प्रतिभा सोमनाथ जोंधळे (२२९४), सदस्य भास्कर योहान खरात, वैभव भाऊसाहेब वदक, पुष्पा तानाजी डेंगळे, ज्ञानेश्वर बाळासाहेब डेंगळे, कमल बाबासाहेब थेटे, संगीता मधुकर तळोले, सुरेश दगडू डेंगळे, मंदा राजेंद्र अरगडे, दिलीप शिवाजी डेंगळे, उषा भीमा पवार, बाबासाहेब ज्ञानदेव डेंगळे, साक्षी अमोल जोंधळे, सीमा बाबासाहेब तळोले, दरेवाडी -सरपंच आनंदा रावसाहेब दरगुडे (३७०), सदस्य मीना रामदास पवार, उत्तम गजाबा कारंडे, वंदना भास्कर मैड, विलास पोपट केदार, सुरेखा भाऊसाहेब माळी, दत्तू अण्णा गायकवाड, शांताबाई भाऊसाहेब नागरे, जांबुत बुद्रुक -सरपंच सोनाली रमेश शेटे (८९४), सदस्य प्रकाश रंगनाथ पारधी, आस्मा पीरमोहम्मद पठाण, सुभाष भिमाजी डोंगरे, रेखा सुरेश गायकवाड, अलका सुनील कुलाळ, सयाजी शांताराम शेटे, उज्वला दत्तात्रय दुशिंगे, गविता राजाराम शिरसाट, संभाजी भाऊसाहेब पारधी, उंबरी बाळापुर- सरपंच अर्चना सुभाष भुसाळ (१२७५), सदस्य किसन सखाराम खेमनर, नानासाहेब सुखदेव उंबरकर, निर्मला हिरामण बर्डे, अश्विनी भगीरथ भुसाळ, मनीषा स्वप्निल उंबरकर, अनिल वसंत सारबंदे, सुभाष सोपान उंबरकर, मारथाबाई तेजानंद शेळके, मच्छिंद्र गोपीनाथ भुसाळ, पूजा योगेश डोखे, राणी विजय शेळके, चिकणी -सरपंच गायत्री सुरेश माळी (९०३), सदस्य संदीप रामचंद्र वर्पे, जमनाबाई मोहन साळुंके, सुवर्णा रवी वपेॅ, आनंदा निवृत्ती वर्पे, सुनंदा मदन नवले, मिनाबाई संतोष वपेॅ, चंद्रभान काशिनाथ मुटकुळे, शिवाजी मारुती वर्पे, वैशाली गोरख वर्पे, सायखिंडी -सरपंच नीलम अमोल पारधी (बिनविरोध), सदस्य अनिता अरुण नन्नवरे, दीपक मोहन करंजकर, वैशाली नवनाथ जेडगुले, विश्वनाथ किसन शिंदे, राजश्री राधाकिसन शिंदे, अर्चना वामन पारधी, शशिकांत आत्माराम गांडोळे, कविता संजय ताजनपुरे, सखाहरी रानबा गुळवे, चिंचोली गुरव -सरपंच विलास रामराव सोनवणे (११३७), सदस्य श्रीकांत बाळासाहेब सोनवणे, चंद्रकला रविदास सोनवणे, शोभा दगडू सोनवणे, महेंद्र हरिश्चंद्र सोनवणे, गणेश मधुकर सोनवणे, सविता विनोद गोडगे, आप्पासाहेब वाल्मीक गोडगे, संगीता बाळू बर्डे, संदेश माधव गोडगे, रवीशा सतीश गोडगे, शितल पंडित गोडगे, निळवंडे- सरपंच शशिकला शिवाजी पवार (९७१), सदस्य सुनिता नानासाहेब भुसारी, प्रभाकर रामभाऊ पवार, भाऊसाहेब जनार्धन आहेर, रूपाली भाऊसाहेब पवार, ताराबाई मारुती केरे, विकास चांगदेव पवार, सुनीता बन्सी गायकवाड, सुनंदा विश्वनाथ पवार, दीपक जगन्नाथ पवार, कर्जुले पठार -सरपंच रोहिणी वाल्मीक भागवत (५२८), सदस्य सुनिता रोहिदास गुंजाळ, संतोष अंकुश दुधवडे, नितीन एकनाथ गोडसे, अलका विक्रम पडवळ, संतोष रावसाहेब आगलावे, सुमन बाळू वाळुंज, विनायक भाऊसाहेब गुंजाळ, रोहिणी वाल्मीक भागवत, जिजाबाई दीपक मधे, खराडी- सरपंच ज्योती बाळासाहेब पवार (७४५), सदस्य मंगल नानाभाऊ चत्तर, भरत सूर्यभान आवारी, कावेरी निलेश पवार, बजरंग पांडुरंग माळी, राजेंद्र भाऊसाहेब कोटकर, सोनाली देविदास वाघ, अक्षय कांतीलाल पवार, प्रियंका ईश्वर पवार, बेबी सुभाष साबळे, वाघापूर -सरपंच स्मिता नानासाहेब शिंदे (६२७), सदस्य संजय राधु शिंदे, सीना कोंडाजी शिंदे, संगीता नकुल बांगर, उल्हास मारुती जाधव, सविता कोंडाजी शिंदे, शारदा रतन आव्हाड, आबासाहेब खंडू शिंदे असे उमेदवार या निवडणुकीत विजयी झाले आहेत. मतमोजणीच्या ठिकाणी ज्या ज्या गावचे उमेदवार विजयी झाले त्या उमेदवारांनी आणि त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. अनेक गावात विजयी उमेदवारांच्या डीजेच्या निनादात मिरवणुका काढण्यात आल्या. यावेळी संगमनेर तालुका, संगमनेर शहर, घारगाव आणि आश्वी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मतमोजणी प्रक्रियेत सुमारे १५० कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. या संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेवर निवडणूक निर्णय अधिकारी तथा संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांचे बारीक लक्ष होते. त्यामुळे कोठेही गडबड गोंधळ झाला नाही.
चौकट :- विजयी झाल्यानंतर माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात गटाचे विजयी झालेले उमेदवार आणि त्यांचे समर्थक कार्यकर्ते गुलालाची उधळण करत शहरातील आमदार बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन या जनसंपर्क कार्यालयात जात होते. तेथे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक इंद्रजीत थोरात, डॉ. जयश्रीताई थोरात, कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ त्यांचे स्वागत करत होते. एकूणच तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतींपैकी तब्बल २७ ग्रामपंचायतीत थोरात गटाने वर्चस्व सिद्ध केले. तर ९ ग्रामपंचायतीत विखे गटाला यश मिळाले. अनेक ठिकाणी सत्ताधाऱ्यांना आपले गड शाबित राखता आले नाहीत. तर काही ठिकाणी अगदी अल्पमताने काहींना पराभवाला सामोरे जावे लागले.