संजीवनीचे विद्यार्थी रशियात ‘बेस्ट प्रोजेक्ट’ पुरस्काराने सन्मानित

0

 20 पेक्षा अधिक देशातील  विद्यार्थ्यांशी  केली स्पर्धा
        कोपरगांव: संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स  (एसजीआय) संचलित विविध संस्थाचे १५ विद्यार्थी संजीवनी इंटरनॅशनल रिलेशन्स विभागाच्या प्रयत्नाने वर्ल्ड रॅन्क ३३१ असलेल्या उरल फेडरल युनिव्हर्सिटी (उर्फु), रसिया येथे २० दिवसाच्या संशोधनात्मक आंतरवासीतेसाठी (रिसर्च इंटर्नशिप ) गेले होते. त्यांचा जाणे, येणे, राहणे व जेवण यासाठी उर्फु व रसिया सरकारने शिष्यवृत्ती  दिली होती. १५ पैकी ६ विद्यार्थ्यांनी प्रोजेक्ट स्पर्धेत भाग घेवुन ‘एल लायझिन फ्रॉम दि ट्रक ऑफ फुड बायोटेक्नॉलाजी’ या विषयावर सादरीकरण देवुन बेस्ट प्रोजेक्ट अवार्ड जिंकले. त्यांना विद्यापीठाच्या प्रा.एलिना व इतर प्राद्यापकांनी सन्मानित केले, अशी  माहिती संजीवनी शैक्षणिक  संकुलाच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
       

 या प्रकल्प स्पर्धेत संजीवनी सिनिअर कॉलेजच्या एम.एससी ऑरगॅनिक केमिस्ट्री विभागाच्या सुमित संजय देवकर, स्वप्निल प्रशांत  ठोंबरे, वैभव मधुकर माळी, तेजल अनिल तांबे, पीजीडीएम विभागाचा दर्शन  आन्नासाहेब चौधरी व एमबीए विभागाचा विशाल  रमेश  थोरात यांनी सहभाग नोंदवुन बेस्ट प्रोजेक्ट अवार्ड जिंकले.
        वरील सहा विद्याथ्यार्थ्यांच्या व्यतिरिक्त संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागाचे शंकर  आनंदा मानुरकर व संस्कृती संतोष  गंभिरे, एमबीए विभागाचे जैद अर्फात शेख, अक्षदा युवराज शेवाळे, कॉम्प्युटर इंजिनिअरींग विभागाची सुजाता सुभाष  मंडाळे, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी विभागाच्या श्रुती लक्ष्मण खडांगळे व संस्कृती विनायक जावळे, संजीवनी सायन्स कॉलेजचे प्रफुल्ल संदिप निळे व पुजा भाऊपाटील शेवकर यांचीही रिसर्च इंटर्नशिपसाठी निवड झाली होती.
         

एसजीआयचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली  संजीवनी इंटरनॅशनल रिलेशन्स विभागाच्या प्रयत्नाने चालु वर्षी  कॅनडा, तैवान, रसिया, युके, ट्युनिसिया , इत्यादी देशातील  नामांकित विद्यापीठांमध्ये ३४ पेक्षा अधिक विद्यार्थ्याची इंटरनॅशनल इंटर्नशिपसाठी निवड झाली होती. याच विभागाच्या प्रयत्नाने १० विद्यार्थी सध्या परदेशात एमएस करीत आहेत. परदेशातील  अनेक नामवंत विद्यापीठांशी  परस्पर समजोता करार संजीवनीने केलेले असल्यामुळे शैक्षणिक  बाबतीत ग्रामिण विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध झाले आहे व विद्यार्थीही संजीवनीने दिलेल्या संधीचे सोने करीत आहे, असे पत्रकात शेवटी म्हटले आहे.
            एसजीआयचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सर्व विजेते विद्यार्थी व डीन-इंटरनॅशनल रिलेशन्स डीपार्टमेंट डॉ. महेंद्र गवळी यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here