बर्नस अँड मॅकडॉनेल कंपनीत नोकरीसाठी निवड
कोपरगांव प्रतिनिधी : संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजचा मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग आणि ट्रेनिंग अँड प्लेसमेंट (टी अँड पी) विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नाने बर्नस अँड मॅकडॉनेल इंडिया या कंपनीने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत सहा अभियंत्यांची वार्षिक पॅकेज रू ५. २५ लाखांवर नोकरीसाठी निवड केली आहे. अशा प्रकारे एका मागे एक कंपनी संजीवनीच्या अभियंत्यांची नोकरीसाठी निवड करीत असुन याद्वारे ग्रामिण भागातील मुलं मुली वयाच्या २२ व्या वर्षी लाखोच्या पॅकेजचे मानकरी बनून संजीवनीच्या माध्यमातून ग्रामिण अर्थकारणाला चालना देत आहे, अशी माहिती कॉलेजच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

पत्रकात पुढे म्हटले आहे की अभियांत्रिकी, पर्यावरण, खरेदी आणि प्रकल्प व्यवस्थापन, इत्यादी क्षेत्रात सेवा प्रदान करणाऱ्या बर्नस अँड मॅकडॉनेल इंडिया कंपनीने निवड केलेल्या अभियंत्यंमध्ये माणसी अनिल देवकर, वैष्णवी प्रमोद कंक्राळे, अक्षय सुधाकर कापसे, केशव रविंद्र मोरे, चैतन्य सुहास राच्चा व राम चांगदेव शेवाळे यांचा समावेश आहे. संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजला शैक्षणिक वर्ष २०१९ -२० पासुन अकॅडमिक ऑटोनॉमस (शैक्षणिक स्वायत्ता) कॉलेजचा दर्जा मिळालेला असल्यामुळे उद्योगांना अभिप्रेत असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अंतर्भाव अभ्यासक्रमात केलेला असल्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी मिळत असल्याचे पत्रकात नमुद केलेले आहे.

संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे यांनी सर्व निवड झालेल्या नवोदित अभियंत्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले तर मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी संजीवनी विद्यापीठाचे व्हाईस चांसलर डॉ. ए. जी. ठाकुर व विभाग प्रमुख उपस्थित होते.

मी कोपरगांव तालुक्यातील टाकळी या खेडेगावातील शेतकऱ्याची मुलगी. याच कॉलेजमध्ये प्रवेश मिळवायचा म्हणुन इ. १२ वीला मी खुप अभ्यास केला आणि प्रवेश मिळविला. कॉलेजच्या दुसऱ्या वर्षापासूनच टी अँड पी विभागाने आमच्यासाठी व्यक्तिमत्व विकास, तंज्ञांची मार्गदर्शक व्याख्याने, मुलाखतींचे तंत्र, संभाषण कौशल्य, इत्यादी बाबींचे धडे दिले.तसेच मला व इतर विद्यार्थ्यांना कॉलेजच्या प्रयत्नातुन तैवानच्या नॅशनल चुंग चेंग युनिव्हर्सिटीमध्ये सहा महिने त्याच युनिव्हर्सिटीच्या संपुर्ण खर्चाने इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. संजीवनीमुळे माझा टाकळी टु तैवान असा प्रवास झाला. या सर्व बाबींमुळे मला सहज रू ५. २५ लाखांच्या वार्शिक पॅकेजची नोकरी मिळाली. संजीवनीमुळे मी आमच्या परीवारातील नोकरी करणारी पहिली मुलगी ठरली आहे. माझे व माझ्या पालकांचे स्वप्न संजीवनीमुळे पुर्ण झाले- इंजिनीअर मानसी देवकर