संजीवनी करतेय विद्यार्थी व पालकांचा विश्वास सार्थ
कोपरगांव प्रतिनिधी : या महाकाय विश्वात प्रत्येक क्षेत्रात आज स्पर्धा आहे. अशा या स्पर्धेच्या जगात पालकांच्या दृष्टीने त्यांची सर्वात अनमोल संपत्ती म्हणजे त्यांची पाल्ये. त्यांच्या पाल्यांना चांगली नोकरी मिळावी, ती स्थिर स्थावर व्हावी, स्वावलंबी व्हावी, म्हणुन ते बालपणापासुन त्यांच्या पंखात बळ भरीत असतात. त्यांना नोकरी मिळावी म्हणुन ते संजीवनी मध्ये आपल्या पाल्यांना विश्वास टाकुन दाखल करतात. संजीवनीची यंत्रणाही सर्व प्रकारचे प्रयत्न करून मुलांना चांगल्या पगाराची नोकरी मिळवुन देते. संजीवनीच्या प्रयत्नातुन अलिकडेच सागर डिफेन्स इंजिनिअरींग प्रा. लि. या कंपनीने कॅम्प्सस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत मुलाखती घेतल्या आणि तब्बल एकविस विद्यार्थ्यांची आकर्षक पगारावर नोकरीसाठी निवड केली. अशा प्रकारे संजीवनी विद्यार्थी व पालकांचा विश्वास सार्थ करत आहे, अशी माहिती संजीवनीच्या अधिकृत सुत्रांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे की सागर डिफेन्स इंजिनिअरींग प्रा. लि. या भारतीय संरक्षण दलाला मानव रहित सागरी वाहने पुरविणाऱ्या कंपनीने निवड केलेल्या विद्यार्थांमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरींगच्या ओम भास्कर अरगडे, दिपिका नवानाथ दहिफळे, सुमित वैभव धिवर, अनंत प्रभाकर गागरे, मनोज जालिंदर गंभिरे, चैतन्य आप्पासाहेब गोरे, प्रांजल राहुल जगताप, मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या योगेश कैलास पेंढारी, अच्युत शेषराव पवार, वैष्णव अनिल पवार, निखिल राधाकृष्ण सानप, श्रेयश संजय कदम, इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरींगच्या हर्षल गोपीनाथ वान्हेरे, मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरींगच्या उमेश सतिश जाधव, निरंजन रामनाथ लभडे, आदित्य अशोक लोखंडे, वैष्णवी विठ्ठल डोळे व एमबीच्या अजय दिलीप देशमुख, कुणाल दिपक धामोने, गायत्री बाळासाहेब लभडे यांचा समावेश आहे.संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे यांनी सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले तर मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला यावेळी संजीवनी विद्यापीठाचे व्हाईस चांसलर डॉ. ए. जी. ठाकुर व विभाग प्रमुख उपस्थित होते.
- मी श्रीरामपुर येथे टेलरींगचा व्यवसाय करतो. माझा मुलगा कुणाल याला एम.ए. पर्यंत श्रीरामपुरला शिकविले. परंतु त्याला या शिक्षणावर नोकरी मिळेल ही आशा धुसर वाटायला लागली. म्हणुन पुढे काय शिकवावे, याचा खुप अभ्यास केला, अनेकांचा सल्ला घेतला, यातुन संजीवनी मध्ये एमबीए करण्याचा पर्याय समोर आला. योगायोगाने त्याला संजीवनीमध्ये प्रवेशही मिळाला. काबाड कष्ट करून कुणालला शिकविले. श्रीरामपुर ते कोपरगांव हा प्रवास तो रोज रेल्वेने करायचा. प्रवासात वेळ जायचा. परंतु असे असताना देखिल त्याने प्रामाणिपणे अभ्यास केला याचा मला अभिमान आहे. आणि संजीवनीच्या प्रयत्नाने चांगल्या पगाराची नोकरी मिळाली व माझ्या कष्टांचे फलित मिळाले. संजीवनीने माझे स्वप्न पुर्ण केले.-पालक दिपक धामोने.