संजीवनी एमबीएचे डॉ. मालकर यांची मार्केटिंग मॅनेजमेंटच्या अभ्यास मंडळाच्या चेअरमनपदी निवड

0

सा. फु. पुणे विद्यापीठाकडून डॉ. मालकर यांची दखल
कोपरगांव: येथिल संजीवनी इंजिनिअरींग कॉलेज अँड  एमबीए महाविद्यालयातील एमबीए विभागाचे विभाग प्रमुख डॉ. विनोद मालकर यांची सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या ‘मार्केटींग मॅनेजमेंट’ या एमबीएच्या स्पेशलायझेशन (विशेषीकरण) शाखेच्या अभ्यास मंडळावर पाच वर्षांसाठी  चेअरमनपदी निवड निवड झाली आहे, डॉ. मालकर यांच्या निवडीने संजीवनी मधिल प्राद्यापकांची आपापल्या विषयातील  सखोल ज्ञान अधोरेखित झाले असुन ग्रामिण भागातील प्राद्यापकाची चेअरमनपदी वर्णी लागणे ही बाब संजीवनी एमबीए साठी अभिमानाची  आहे, अशी माहिती महाविद्यालयाच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
डॉ. मालकर यांच्या निवडीबध्दल संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष श्री नितीनदादा कोल्हे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी डॉ. मालकर यांचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार केला. विश्वस्त  श्री सुमित कोल्हे व डायरेक्टर डॉ. ए. जी. ठाकुर यांनीही त्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सर्व प्रथम जानेवारी २०२३ मध्ये मार्केटिंग मॅनेजमेंट या स्पेशलायझेशनच्या अभ्यास मंडळावर ११ सदस्यांची निवड झाली होती. त्यातुन आता डॉ. मालकर यांची चेअरमनपदी निवड झाली असुन त्यांच्या अध्यक्षतेखाली आता दोन वर्षांच्या  अभ्यासक्रमातील ३४ विषयांची पुनर्रचना होणार आहे.
चौकटः
  खरं तर सावित्रीबाई फुुले पुणे विद्यापीठाला फार मोठी शैक्षणिक  परंपरा व वारसा आहे. या विद्यापीठाच्या अखत्यारीत पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील १४५ एमबीए शिक्षण देणाऱ्या  संस्था आहेत. या सर्व महाविद्यालयांमधुन मार्केटींग मॅनेजमेंटच्या अभ्यास मंडळावर संजीवनी एमबीएच्या डॉ. मालकर यांची चेअरमनपदी निवड होणे, ही बाब कोपरगांव तालुक्याला भूषणावह आहे. संजीवनी एमबीए ही ऑटोनॉमस संस्था असल्यामुळे त्यांना एमबीए क्षेत्रातील जागतिक पातळीवर नवनवीन बदलांचा, कार्पोरेट जगताला अभिप्रेत असलेल्या बाबींची जाणिव आहे. त्यांच्या पुर्ण टीम कडून मार्केटींग मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमाची वर्ल्डक्लास पुनररचना होवुन अनेकांना देश विदेशात  चांगल्या नोकऱ्या  मिळतील. तसेच डॉ. मालकर यांच्या पुढाकाराने परदेशातील नामवंत विद्यापीठांशी  सामंजस्य करारही होतील, असेही अपेक्षित आहे. – श्री अमित कोल्हे.
फोटो ओळीः संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी संजीवनी एमबीएचे डॉ. विनोद मालकर यांचा पुणे विद्यापीठ अभ्यास मंडळावर चेअरमनपदी निवड झाल्याबध्दल सत्कार केला. यावेळी डॉ. ठाकुर उपस्थित होते.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here