ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग करतोय पालक व विद्यार्थ्यांचे स्वप्न पुर्ण
कोपरगांव: संजीवनी एमबीए च्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ( टी अँड पी ) विभागाच्या प्रयत्नाने संजीवनी एमबीए च्या पाच विद्यार्थ्यांची पाच वेगवेगळ्या कंपन्यांनी नोकरीसाठी त्यांच्या अंतिम परीक्षा व निकाला अगोदरच आकर्षक पगारावर निवड केली आहे, अशी माहिती संजीवनी एमबीए च्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे (एसजीआय) अध्यक्ष नितीनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आहे.
अजय दिलिप मकासरे याची नवकार लुबे सर्विसेस, प्रविणकुमार शिवाजी जेवरे याची ईग्नाईट इनोव्हेटीव इन्स्टिटयूट , सौरभ नवनाथ थोरात याची मार्केट इंटिलिजन्स, दिनेश कचरू लोहकरे याची लिअर इंडिया इंजिनिअरींग व गणेश रमेश पवार याची स्वर्णा प्रगती मायक्रो फायनान्स कंपनीने निवड केली आहे. संजीवनी एमबीला ऑटोनॉमस संस्थेचा दर्जा प्राप्त असल्यामुळे वेगवेगळ्या कंपन्यांना अभिप्रेत असलेला आधुनिक अभ्यासक्राचा अंतर्भाव संजीवनी एमबीए ने केलेला असल्यामुळे एकापाठोपाठ एक कंपनी संजीवीच्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी पसंती देत असल्याचे पत्रकात महटले आहे.
चौकटः
मी एमबीए ला प्रवेश घेण्याच्या अगोदर बी.कॉम. केले, परंतु नोकरी मिळाली नाही. आई वडीलांची घरची परीस्थिती तशी जेमतेमच होती. परंतु मी स्वावलंबी व्हावे, मला चांगली नोकरी मिळावी हे माझे व माझ्या आई वडीलांचे स्वप्न होते. संजीवनी एमबीए मध्ये प्रवेश घेतला तर संजीवचा टी अँड पी विभाग चांगल्या कंपनीत नोकरी मिळवुन देतो, हे मला माहित होते. म्हणुन येथेच प्रवेश घेतला. टी अँड पी विभागाने माझ्याकडून मुलाखतींचा सराव करून घेतला. संभाषण कौशल्यावर विशेष भर दिला. तसेच शिक्षकांनी फायनान्सचे चांगले ज्ञान दिले. या सर्व बाबींमुळे मी स्वर्ना प्रगती मायक्रो फायनान्स कंपनीची मुलाखत सहज देवु शकलो, आणि अंतिम निकाला अगोदरच माझी नोकरीसाठी निवड झाली, याचे सर्व श्रेय मी संजीवनी एमबीए ला देतो. संजीवनी मुळेच माझे व माझ्या आई वडीलांचे स्वप्न पुर्ण झाले.-विद्यार्थी गणेश पवार.