संजीवनी एम.फार्मसीच्या १२ विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय  कंपन्यांमध्ये नोकऱ्यांसाठी निवड

0

ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाचे यश
कोपरगांव: संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स  (एसजीआय) संचलित संजीवनी एम.फार्मसी महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने १२ एम . फार्मसी विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय  औषध निर्माण कंपन्यांनी कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत आकर्षक  पगारावर नोकऱ्यांसाठी  निवड केली आहे, अशी  माहिती संस्थेच्या अधिकृत सुत्रांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
       

पत्रकात पुढे म्हटले आहे की संजीवनी एम. फार्मसी महाविद्यालयाला ऑटोनॉमस दर्जा प्राप्त असल्याने औषध निर्माध कंपन्यांना अभिप्रेत असलेल्या आधुनकि संशोधनात्मक अभ्यासक्रमाचा समावेश  करण्यात आलेला आहे. यामुळे महाविद्यालयाचा १०० टक्के विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या  मिळवुन देण्याचा प्रयत्न असतो. या प्रयत्नांना यश  म्हणुन पहिल्या १२ विद्यार्थ्यांचे नेमणुक पत्रे हाती आले असुन उर्वरीत विद्यार्थ्यांचे नेमणुक पत्रे लवकरच प्राप्त होतील, असे पत्रकात म्हटले आहे.
       

  विविध बहुराह्स्त्रीय  कंपन्यांनी निवड केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये अलेम्बिक फार्मा कंपनीने जीवन ज्ञानेश्वर  सोमवंशी , वैष्णवी  विलास वाळेकर व सुरभी संतोष  भंडारी यांची निवड केली आहे. एमक्युअर फार्मा प्रा. लि. कंपनीने प्रियमाला एकनाथ अवचर व आदिती विजय मोमाळे यांची निवड केली आहे. एलिसियम फार्मा कंपनीने संकेत कृष्णाकुमार जोशी  याची तर ग्लेनमार्क फार्मा कंपनीने सिध्दी नितीन जोषी व श्रध्दा शांताराम  फटांगरे यांची निवड केली आहे. आयपीसीए फार्मास्युटिल्स कंपनीने महेश  संतोष  निखाडे व तेजस सुधाकर झाल्टे यांची निवड केली आहे. लुपिन फार्मा कंपनीत अभिजीत चंद्रकांत पालवे याची तर मार्कसन फार्मा कंपनीत अवेश  अस्लम तांबोळीची निवड झाली आहे.
            एसजीआयचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेले विद्यार्थी, त्यांचे पालक, डायरेक्टर डॉ. विपुल पटेल व ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाचे डीन डॉ.निलेश  पेंडभाजे यांचे अभिनंदन केले आहे.     

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here