कोपरगांव: महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण परीक्षा मंडळाने जानेवारी 2023 मध्ये प्रथम वर्ष ते तृतिय वर्षांच्या विषम सत्राच्या घेतलेल्या हिवाळी परीक्षांचे निकाल जाहिर केले असुन यात संजीवनी के.बी.पी. पाॅलीटेक्निकने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. या परीक्षेत काॅम्प्युटर टेक्नाॅलाॅजी विभागातील पाचव्या सत्रातील क्रिश भरत पोरवालने ९६ टक्के असे विक्रमी गुण मिळवुन पाॅलीटेक्निक मध्ये सर्व प्रथम गुणानुक्रमाने उत्तिर्ण होण्याचा बहुमान मिळवुन संजीवनीचा सर्वोत्कृष्ट शैक्षणिक दर्जा अधोरखित केला आहे, अशी माहिती प्राचार्य ए. आर. मिरीकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात प्रा. मिरीकर यांनी पुढे म्हटले आहे की व्यवस्थापनाच्या मार्गदर्शनाखाली सर्वगुण संपन्न नागरीक घडविण्याचा प्रयत्न केला जातो. विद्यार्थ्यांमध्ये प्रत्येक चांगल्या पैलुची रूजवण व्हावी, यासाठी जाणिवपुर्वक प्रयत्क केले जातात, मात्र यातही शैक्षणिक दर्जाकडे विशेष लक्ष पुरविल्या जाते, यामुळे तांत्रिक शैक्षणिक जगतात संजीवनी पाॅलीटेक्निकने विविध क्षेत्रात आपले नाव उंचावले आहे.
अलिकडेच झालेल्या हिवाळी परीक्षेत विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी केली आहे. यात पाचव्या सत्रातील काॅम्प्युटर टेक्नालाॅजी विभागातील क्रिश भरत पोरवालने ९६ टक्के गुण मिळवुन सर्व प्रथम क्रमांक मिळविला तर याच विभागात पाचव्या सत्रात प्रतिक्षा बाळासाहेब चांदर व आयुश उध्दव ससाणे यांनी अनुक्रमे ९४. ५६ व ९३ टक्के गुण मिळवुन दुसरा तिसरा क्रमांक मिळविला. पाचव्या सत्रात मेकॅट्राॅनिक्स विभागात यशश्री हरेश चौधरी हिने ९४. ८४ टक्के गुण मिळवुन प्रथम क्रमांक मिळविला तर रितेश सोमनाथ औताडे याने ९३. १६ व जागृती किशोर शेळके हिने ९२. ३२ टक्के गुण मिळवुन अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले. याच सत्रात सिव्हिल इंजिनिअरींगच्या सुहानी वसंत सोमासे हिने ९१. २० टक्के गुण मिळवुन प्रथम क्रमांवर शिक्कामोर्तब केले तर अनुजा निलेश सांगळे व श्रेया अरूण शेळके यांच्यातील चुरशीत अनुक्रमे ८६. व ८६. ४० टक्के गुण मिळवुन दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला. इलेक्ट्रिकल इंजिनिअरींगच्या चैतन्य राजाराम खरातने पाचव्या सत्रात ८६. ६० टक्के मिळवत प्रथम क्रमांक मिळविला तर सोहम खुशालचंद विसपुते व हर्षदा संतोश पवार यांनी ८५. ८० व ८५ टक्के गुण मिळवुन दुसरा व तिसरा क्रमांक पटकाविला. मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात पाचव्या सत्राच्या मंगेश राजेंद्र लव्हाळे व शिवम रमेश देवकर या दोघांनीही ८३. ३३ टक्के मिळवुन प्रथम क्रमांक मिळविला. पुर्वा अनिल भोंगळे व साईराम जावळे यांनी अनुक्रमे ८२. ७६ व ८२. २९ टक्के गुण मिळवून दुसरा व तिसरा क्रमांक पटकाविला.
द्वीतिय वर्षाच्या तिसऱ्या सत्रातील निकाल पुढिलप्रमाणे. शाखा निहाय पहिले तीन क्रमांक, कंसातील आकडे शेकडा गुण दर्शवितात. काॅम्प्युटर टेक्नालाॅजी-गौरी अरविंद लंके (९६. १३), संस्कृती दिलीप पाटील (९५. ४७), प्रियंका नवनाथ पवार (९४. २७). मेकॅट्राॅनिक्स-अकांशा रूपेश नागपुरे (९०. ७८ ), आकाश नवनाथ जऱ्हाड (८९. ६७), मयुरी सुरींदर वावळे (८९. ५६). सिव्हिल इंजिनिअरींग-हर्षल किशोर परजणे (९२. ३३), वरूण रविंद्र चौधरी (९२. २२), अक्षय अनिल औताडे (८३. ४४). इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग-शुभम संजय कातकडे (८९. १३), कौस्तुभ वाल्मिक भोसले (८७. ५०), सिध्दी गणेश वाकचौरे (८७. १३). मेकॅनिकल इंजिनिअरींग- संजना घनशाम चांदर (८६. २१), पद्मश्री प्रशांत बोळीज (८१. ७९), भावी आनंद चौहान (७८. ८४).
प्रथम वर्षाचे प्रथम सत्र. काॅम्प्युटर टेक्नाॅलाॅजी-श्रावणी उमेश गायकवाड (९२. ४३), वेदांत राजेंद्र भाकरे (८९. २९), सारा संदिप वाघचौरे (८८. ८६). मेकॅट्राॅनिक्स-अनुष्का संतोष ससाणे (८७. २९), सुमित मनोज जगझाप (८६. २९), निकिता प्रदिप बोऱ्हाडे (८५. ५७). सिव्हिल इंजिनिअरींग-प्रसाद हेमंत वाघ (८५. १४), मृणाल श्रीप्रसाद भागवत (८३. ८६), क्षितिजा सुभाष हराळे (८३. १४). इेलक्ट्रिकल इंजिनिअरींग- श्रेयश संतोष शिंदे (८१), अजय बाबासाहेब मापारी (७६. ७१), संयोगीता सर्जेराव वल्टे (७६. ५७). मेकॅनिकल इंजिनिअरींग-प्रिती विजय नाईकवाडी (८६. २९), पायल योगेश धोंडलकर (८३. १४ ) व प्राची बाबासाहेब नवले (८१. ६७ ).
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे व विश्वस्त सुमित कोल्हे यांनी सर्व गुणवंत विध्यार्थी व त्यांच्या भाग्यवान पालकांचे अभिनंदन केले आहे.