महाराष्ट्र शासनाच्या वतीने अधिकृत प्रवेश प्रक्रिया केंद्र
कोपरगांव: संजीवनी के.बी.पी. पॉलिटेक्निक मधिल अद्ययावत संगणकीय प्रयोगशाळा, पुरेश क्षमतेची इंटरनेट सुविधा, प्रशिक्षित व योग्य संवाद साधणारा प्राद्यापक वर्ग, इत्यादी बाबींचा विचार करून महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षणालय, मुंबई (डी.टी.ई.) च्या वतीने संजीवनी के.बी.पी. पॉलीटेक्निकमध्ये २०२३-२४ च्या प्रथम वर्ष पॉलिटेक्निक प्रवेशासाठी दि. १ जुन पासुन प्रथम वर्ष ऑन लाईन प्रवेश सुविधा केंद्र (फॅसिलिटेशन सेंटर) सुरू झाले असुन विद्यार्थ्यांनी दि.२१ जुन पर्यंत ऑन लाईन रजिस्ट्रेशन करून कागदपत्रांची पडताळणी करून घ्यायची आहे, अशी माहिती प्राचार्य ए.आर. मिरीकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात प्रा मिरीकर यांनी सांगीतले आहे की भारतीय नागरीकत्व असेलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या गुणांच्या आधारे प्रवेश मिळणार आहे. सध्या इ. १० वीचे निकाल जाहीर झाले असले तरी विध्यार्थ्यांकडे गुणपत्रिका प्राप्त नाही, म्हणुन ऑनलाईन नोंदणी करते वेळेस फक्त इ. १० वी बोर्डाकडून प्राप्त झालेला आसन क्रमांक द्याायचा आहे. एसएससी निकालानुसार विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन अर्जावर त्यांचे गुण सॉफ्टवेअरद्वारे आपोआप नोंदल्या जाणार आहेत. मात्र सीबीएसई/आयसीएसई मंडळाकडून दहावीच्या परीक्षेच्या जाहिर झालेल्या निकालाची झेरॉक्स प्रत असणे गरजेचे आहे. पॉलीटेक्निक प्रवेशासाठी कोणत्याही प्रकारची प्रवेश परीक्षा नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांवरील माणसिक तणाव राहीलेला नाही.
पॉलीटेक्निक प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थी येथिल सुविधा केंद्राच्या मार्फत संजीवनीसह महाराष्ट्रात कोठेही प्रवेशासाठी पात्र असणार आहेत. विद्यार्थ्यांना या केंद्रामार्फत त्यांचा कल आणि सध्या मागणी असलेल्या पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमांविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना आता पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया व पदविका अभियांत्रिकी शिक्षण पुर्ण केल्यावर भविष्यातील संधी हे जाणुन घेण्यासाठी आता कोठेही जाण्याची गरज नाही. या संधीचा फायदा घेण्यासाठी इच्छुकांनी संजीवनी सुविधा केंद्रास भेट देवुन ऑन लाईन प्रवेश प्रक्रिया पुर्ण करावी, उमेदवारांच्या जाती निहाय संवर्गानुसार आवश्यक कागदपत्र व इतर माहितीसाठी या केंद्रातुन मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तज्ञ प्राद्यापकांची या केंद्रात नेमणुक केली असुन शिष्यवृत्या , शैक्षणिक कर्ज व त्यासाठी लागणारे कागदपत्र, तसेच प्रवेशासाठी लागणारे कागदपत्र या संदर्भात सखोल माहिती येथे मिळणार आहे. ऑनलाईन अर्जासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील विध्यार्थ्यांसाठी रू ४०० तर इतर सर्व राखिव प्रवर्गातील विध्यार्थ्यांसाठी रू ३०० शुल्क लागणार आहे. सदरचे शुल्क ऑनलाईन पध्दतीने क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड/युपीआय/नेटबॅकिंगद्वारे भरणे गरजेचे आहे. अधिक माहितीसाठी प्रा. राहुल भाकरे (९५११७५७७१५) यांच्याशी संपर्क साधावा असे प्रा. मिरी