संजीवनी पॉलीटेक्निकचा वरूण चौधरी ९६. ७४ टक्के गुण मिळवुन सर्व प्रथम

0

 तृतिय वर्षाचा  सरासरी निकाल ९१ टक्के, उत्कृष्ट  निकालाची परंपरा कायम
कोपरगांव: महाराष्ट्र   राज्य तंत्र शिक्षण  परीक्षा मंडळाने एप्रिल-मे २०२४ मध्ये घेतलेल्या परीक्षांचे निकाल नुकतेच जाहिर केले असुन यात सम व विषम  सत्रांच्या निकालात संजीवनी के.बी.पी. पॉलीटेक्निकच्या सिव्हिल इंजिनिअरींग विभागाच्या तृतिय वर्षाच्या  वरूण रविंद्र चौधरीने ९६. ७४ टक्के गुण मिळवुन सर्व विभागातुन प्रथम क्रमांकाने उत्तिर्ण होण्याचा बहुमान मिळवित आपल्या प्रतिभा संपन्नतेचे दर्शन  घडविले. सर्व विभाग मिळुन तृतिय वर्षाचा  सरासरी निकाल ९१ टक्के लागला असुन संजीवनी पॉलीटेक्निकने उत्कृष्ट  निकालाची परंपरा कायम राखली आहे. प्रथम वर्ष  ते तृतिय वर्षात  एकुण १०२  विद्यार्थ्यांनी ९० टक्यांपेक्षा अधिक गुण मिळविले तर २५ विद्यार्थ्यांनी काही विषयांमध्ये १०० पैकी १०० गुण मिळविले, अशी  माहिती संजीवनी पॉलीटेक्निकने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
             तृतिय वर्षाचा  निकाल पुढील प्रमाणे. कंसातील आकडे शेकडा गुण दर्शवितात दर्शवित असुन विद्यार्थ्यांच्या नावाच्या क्रमानुसार पहिला, दुसरा व तिसरा गुणानुक्रमांक आहे. सिव्हिल इंजिनिअरींगः वरूण रविंद्र चौधरी (९६. ७४), हर्षल  किशोर परजणे  (९६. ०५), चेतन संजय गायकवाड  (९२. ६८). कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीः संस्कृती दिलीप पाटील  (९६. ६९), गौरी अरविंद लंके  (९५. ५४), प्रियंका नवनाथ पवार (९५. ०९).मेकॅट्रॉनिक्सः मयुरी सुरींदर वावळे  (९६. २२), अथर्व भानुपाटील गुरूळे  (९५. २६), अथर्व भरत वाघमारे  (९५. ११). इलेक्ट्रिकल इंजिनिअरींगः कौस्तुभ वाल्मिक भोसले  (९३), शुभम संजय कातकडे  (९१. ७८), सार्थक एकनाथ कांबळे  (९०. १७). मेकॅनिकल इंजिनिअरींगः संजना घनशाम चांदर (९०. ९२), भावी आनंद चौहान  (८९. २८), पद्मश्री प्रशांत  बोळीज  (८७. ९५).
       द्वीतिय वर्ष -सिव्हिल इंजिनिअरींगः क्षितिजा सुभाष  हराळे  (८८. ७१), मृणाल श्रीपाद भागवत  (८५. ४१), प्रतिक एकनाथ पावडे  (८१. १८).कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीः यज्ञा उदय बोठे  (९४), श्रावणी उमेश  गायकवाड  (९३. २०), अनुष्का  नितिन मगर  (९२. ९३).मेकॅट्रॉनिक्सः अनुष्का  संतोष  ससाणे  (९२. ७४ ), आदिती रविंद्र भागवत  (९०. ९५), अच्युत प्रणिल चौधरी  (८८. ११).इलेक्ट्रिकल इंजिनिअरींगः प्रियंका संजय वाघ  (८८. ७९), क्रिष्णा शशिकांत  लोखंडे (८७. ०४), निखिल संतोष  पवार (८५. ५७).मेकॅनिकल इंजिनिअरींगः प्रिती विजय नाईकवाडी  (९०. ५७), ओमकार दिलीप मोरे  (८६. ११), साक्षी नवनाथ वर्दे (८२. २९)..
     प्रथम वर्ष -सिव्हिल इंजिनिअरींगः सनी कुमार  (८८. २९), श्रावणी सतिश सोनजे  (८७. ४९), देविदास बापु खळाणे  (८३. ७१).कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीः हितेन समिर शाह  (९३. ६४4), स्तिमीत सतिष  आढाव  (९२. ८८), मोनिका संजय माताडे  (९१. ९४). मेकॅट्रॉनिक्सः वैष्णवी  बाबासाहेब मापारी  (९३. ३४), प्रतिक्षा किसन पवार  (९०. ७४),  ट्विंकल हरेष  चौधरी (९०. २८).इलेक्ट्रिकल इंजिनिअरींगःनंदिनी सचिन मगर  (८८. ११), योगेश  रामदास तुरकणे  (८४. १७), गणेश  सुनिल वाघ  (८३. २३).मेकॅनिकल इंजिनिअरींगः प्रथमेश  ऊमेश  लकारे  (९१. ५४), श्रेयश  नारायण शिंगारे  (८६. ९१) व अक्सा बदरूद्दीन शेख  (८२. १७).
       संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक, प्राचार्य ए. आर. मिरीकर व सर्व विभाग प्रमुखांचे अभिनंदन केले आहे. तसेच श्री अमित कोल्हे यांनी उपस्थित पहिले तीन टॉपर विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here