कोपरगांव:संजीवनी विद्यापीठ व संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स अतंर्गत असलेल्या विविध व्यावसायिक शिक्षण संस्थांची वाटचाल प्रगत शैक्षणिक पध्दतीनुसार योग्य दिशेने सुरू आहे. प्रगत शैक्षणिक संस्थांच्या तुलनेत संजीवनी कोठेही मागे नाही. येथे विद्यार्थी घडवुन समाजाच्या हिताचे कार्य केल्या जाते. भविष्यात डेलावेर विद्यापीठाकडून प्रगत तंत्रज्ञानाच्या संदर्भात जे सहकार्य लाभेल, ते केल्या जाईल, असे उद्गार अमेरिकेच्या डेलावेर विद्यापीठाचे संचालक व संशोधन सल्लागार तसेच नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (नासा) या अंतराळ संस्थेचे माजी संशोधक व नासा मध्येच १९९५ साली एक्सलंस इन रिसर्च अवार्ड मिळविलेले डॉ. चंद्रा कंभामेट्टू यांनी त्यांच्या संजीवनी शैक्षणिक संकुलाच्या भेटी दरम्यान काढले.
संजीवनी विद्यापीठाच्या सभागृहात आयोजीत केलेल्या चर्चा सत्रात डॉ. चंद्रा कंभामेट्टू बोलत होते. यावेळी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, संजीवनी विद्यापीठाच्या प्रो व्हाईस चांसलर डॉ. जे जानेथ, डीन डॉ. कविथा राणी, इंजिनिअरींग कॉलेजचे डायरेक्टर डॉ. ए.जी. ठाकुर, फार्मसी महाविद्यालयाचे डायरेक्टर डॉ. विपुल पटेल, इंटरनॅशनल रिलेशन्स विभागाचे डीन डॉ. महेंद्र गवळी, स्कूल ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंटचे डीन डॉ. विनोद मालकर, संजीवनी सिनिअर कॉलेजचे प्राचार्य डॉ. समाधान दहिकर, ज्यु. कॉलेजचे प्राचार्य डॉ. रावसाहेब शेंडगे , पॉलीटेक्निकचे डीन अकॅडेमिक्स डॉ. किशोर जाधव, आदी उपस्थित होते.
प्रारंभी डॉ. गवळी यांनी संजीवनी विद्यापीठ व संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित विविध संस्थांची पावर पॉईंट प्रेझेंटेंशनद्वारे माहिती देवुन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उपलब्धींचा चढता आलेख मांडला. तसेच प्रो व्हॉईस चांसलर, डायरेक्टर्स, डीन्स यांनी आपापल्या विभागातील अभ्यासक्रम रचनेची व शिक्षण पध्दतीची माहिती दिली. यावर डॉ. चंद्रा कंभामेट्टू यांनी वरील प्रमाणे प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
यावेळी अमित कोल्हे म्हणाले की संस्थेचे संस्थापक स्व. शंकरराव कोल्हे यांनी जी दुरदृष्टी ठेवली होती, तिची अंमलबजावणी संस्थेचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक परीणामकारक चालु आहे. महाराष्ट्रात इंजिनिअरींगच्या ४० टक्यांपर्यंत जागा रिक्त राहतात, मात्र येथे पुर्ण क्षमतेने सर्व संस्थांच्या जागा भरतात, ही संजीवनीची विश्वासहर्ता आहे. विद्यार्थ्यांना उद्योग जगतातील घडामोडी, उद्योगांना अभिप्रेत असणारे ज्ञान, इत्यादी बाबी त्यांना अवगत होण्यासाठी माजी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शने , अनुभवी अभियंत्यांची मार्गदर्शने तसेच उच्च पदस्थ अधिकारी व उद्योजकांची मार्गदर्शने , असे आयोजन करण्यात येते. याचा परीणाम विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळण्यास होत आहे.
या चर्चासत्रानंतर डॉ. चंद्रा कंभामेट्टू यांनी विद्यापीठातील कॉम्प्युटर सायन्स व सायबर सिक्युरीटीच्या विद्यार्थ्यांसमोर कॉम्प्युटर व्हीजन व कॉम्प्युटर फ्युजन या विषयावर व्याख्यान दिले. तसेच त्यांच्या प्रयोगशाळेतील रिसर्च प्रोजेक्ट्स बध्दलची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही दिली.