संतप्त ग्रामस्थांनी वाळू वाहतूक करणारी वाहन दिली पकडून

0

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी, 

        राहुरी येथील तहसीलदार नामदेव पाटील हे राहुरी येथे रुजू झाल्यापासून तालूक्यात दिवसा ढवळ्या बेसुमार वाळू तस्करी सुरु झाली आहे. तालूक्यातील करजगाव येथे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेवून वाळू वाहतूक करणारे तीन ढंपर पकडून महसूल प्रशासनाच्या ताब्यात देऊन कारवाई करण्याची मागणी केली. 

          राहुरी तालुक्यातील करजगाव व लाख येथे प्रवरानदी नदी पात्रातून शासकीय डेपोच्या नावाखाली बोटीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर वाळू उत्खनन चालू आहे. काही ढंपरमधून अवैध वाळू डेपोवर खाली न करता परस्पर बेकायदेशीर विक्री केली जात आहे. ग्रामस्थांनी याबाबत तहसीलदारांकडे तक्रार केली. मात्र तहसीलदार यांनी वाळू तस्करांना पाठीशी घालण्यासाठी त्या तक्रारीकडे दुर्लक्ष करून अद्याप पर्यंत कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही. परिणामी संतप्त झालेल्या करजगाव येथील ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेऊन अवैध सुरू असलेला वाळू उपसा करुन वाहतूक करणारे तसेच डेपोकडे न जाता परस्पर विक्रीसाठी जात असताना तीन ढंपर पकडून महसूल प्रशासनाच्या ताब्यात दिले.

यावेळी ढंपर क्रमांक एम एच ४३ वाय १४२९, एम एच १७ टी ९८१५ हे रिकामे ढंपर आणि एम एच १४ ए एस ९७२५ हा वाहन वाळूने भरलेला ढंपर डेपोकडे न जाता परस्पर विक्रीसाठी जात असताना ग्रामस्थांनी पकडले आहे. यावेळी ग्रामस्थ व पंचांनी एका ढंपर चालकाकडे विचारणा केली असता एक ढंपर डेपोकडे न नेता परस्पर ब्राह्मणगाव भांड शिवारात खाली केल्याचे सांगितले. दुसर्‍या एका ढंपर चालकाकडे विचारणा केली असता प्रवरानदी पात्रात उत्खनन करून डेपो कडे न जाता नरसाळी, ता. श्रीरामपूर शिवारात खाली केली असल्याचे सांगितले. सदर उत्खननाच्या ठिकाणाहून गेल्या अनेक दिवसापासून उत्खनन करून वाळूने भरलेले ढंपर डेपोवर न जाता परस्पर बेकायदेशीर पणे कुठल्याही प्रकारची पावती अथवा शासकीय परवानगी न घेता विक्रीसाठी जात आहेत. पकडलेले ढंपर पुढील कारवाईसाठी देवळाली प्रवराचे मंडलाधिकारी व राहुरी महसूल पथकाच्या ताब्यात देऊन बेकायदेशीर रित्या चालू असलेला वाळू उपसा कायमस्वरूपी बंद केला आहे.

       

यावेळी माजी सरपंच गणेश कोतकर, बाळासाहेब कोतकर, नवनाथ कोतकर, काकासाहेब आरंगळे, सुदाम कोतकर, अण्णासाहेब देठे, शंकर कोतकर, नरेंद्र कोतकर, जावेद पठाण, अविनाश आरंगळे, बबन लोंढे, सोमनाथ कोतकर, लक्ष्मण देठे, अमोल कोल्हे, खंडू गांगुर्डे, किरण आरंगळे, सोमेश्वर कोतकर, अजय कोतकर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

         मात्र या घटनेमुळे राहुरी तालुक्यात महसूल प्रशासनाच्या आर्शिवादाने मोठ्या प्रमाणावर अवैध रित्या वाळू तस्करी सुरु असल्याचे दिसून आले आहे. वाळू तस्कर व महसूलचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध असल्याने महसूल प्रशासन वाळू तस्करीवर कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here