कोपरगाव : येथील संत जनार्दन स्वामी महाराज महर्षी स्कूलचे राजेंद्र पानसरे यांना आदर्श मुख्याध्यापक तर क्रीडा मार्गदर्शक शिवप्रसाद घोडके यांना गुणवंत क्रीडा मार्गदर्शकाचा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला आहे.
अहमदनगर जिल्हा गणित अध्यापक मंडळ यांच्या वतीने आदर्श मुख्याध्यापक पुरस्कारासाठी कोपरगाव येथील संत जनार्दन स्वामी महाराज महर्षी स्कूल चे प्राचार्य राजेंद्र पानसरे यांच्या कार्याची दखल घेत आदर्श मुख्याध्यापक म्हणून निवड करून त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तसेच अहमदनगर जिल्हा ऑलिम्पिक असोसिएशन च्या वतीने अनेक खेळाडूंना व्होलीबॉल आणि तलवारबाजी या खेळामध्ये अनेक खेळाडूंना मार्गदर्शन करून राज्य, राष्ट्रीय खेळाडू घडवील्याबद्दल विद्यालयचे क्रीडा विभाग प्रमुख शिवप्रसाद घोडके यांना गुणवंत क्रीडा मार्गदशक म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पुरस्काराचे स्वरूप प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह असे आहे.
या यशाबद्दल संस्थेचे विश्वस्त आणि मठाधीपती प. पु. रमेशगिरी महाराज, अध्यक्ष दत्तात्रय होळकर, उपाध्यक्ष विलास कोते पाटील, सचिव अंबादास अंत्रे, विश्वस्त भाऊ पाटील, रामकृष्ण कोकाटे, अनिल जाधव, , अतुल शिंदे, आशुतोष पानगव्हाणे, बाळासाहेब चव्हाण, शिवनाथ शिंदे, प्राचार्य राजेंद्र पानसरे, प्रशासकीय अधिकारी डॉ श्रीरंग झावरे, उपाप्रचार्य कैलास ढमाले आणि सर्व शिक्षक वृंदानी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.