श्रीछत्रपती शिवाजीनगर येथे संत वामनभाऊ व संत भगवान बाबा यांची संयुक्त पुण्यतिथी उत्साहात साजरी
अहमदनगर (प्रतिनिधी) संत वामभाऊ व संत भगवान बाबांनी किर्तन प्रवचनाच्या माध्यमातून अज्ञानी, अंधश्रध्दा, कर्मकांड यांवर प्रहार करुन भरकटलेल्या समाजाला खरा परमार्थ सांगीतला व योग्य दिशा दिली असे मत संत शिरोमणी शेख महंमद महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष ह.भ.प. सिध्दीनाथ मेटे महाराज यांनी व्यक्त केले.
कल्याणरोड येथील पुनम मंगल कार्यालय येथे संत भगवान बाबा व संत वामभाऊ यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. सकाळी 9 ते 10 या वेळेत सिध्दीविनायक मंदिरापासून दिंडी प्रदक्षिणा भगवान बाबा मंदिर ते कार्यालयापर्यंत टाळ मृदंगाच्या जयघोषात पूर्ण झाली. 10 ते 12 या वेळेत पुण्यतिथी निमित्त किर्तन झाले व नंतर महाप्रसादाचा लाभ वारकर्यांनी घेतला.
यावेळी मा.नगरसेवक संजय शेंडगे, नगरसेवक गणेश कवडे, श्याम आप्पा नळकांडे, सचिन शिंदे, ह.भ.प. नेटके महाराज, ह.भ.प. दत्तात्रय महाराज खांदवे, ईश्वर महाराज नवसुपे, बाजीराव महाराज वराट, आल्हाडे महाराज, सागर शेळके, रवि त्रिभुवन, बाबासाहेब सानप, नर्मदेश्वर वारकरी शिक्षण सस्थितील विद्यार्थी आदींसह समाज बांधव व भाविक उपस्थित होते.
पुढे बोलतांना मेटे महाराज म्हणाले की, संत वामनभाऊ आणि संत भगवान बाबांनी आपले संपुर्ण जीवन वारकरी संप्रदायासाठी समर्पित केले, ते अजन्म ब्रह्मचारी राहिले. सर्व जाती धर्मातील सामान्य लोकांना सोबत घेऊन परमार्थ केला. गावोगावी जावून पशुहत्या बंद केल्या, किर्तनाच्या माध्यमातून शिक्षणाचे महत्व समजावून दिले. नारळी सप्ताह व आषाढी कार्तीकी, आळंदी दिंडी काढून समाज परिवर्तन करण्याचे महत्वाचे काम केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिनकर आघाव गुरुजी, संजय गर्जे, बाळकृष्ण दौंड, दत्तात्रय शिरसाठ, सुधाकर साबळे, वारे साहेब, अॅड. दराडे साहेब, गोविंद गोल्हार, मारुतीराव गीते, नंदकुमार सांगळे, ज्ञानदेव सांगळे, सोमनाथ गीते, सतिष गीते आदींनी परिश्रम घेतले.