संवत्सरच्या क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले वाचनालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी

0

कोपरगाव: कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले मागासवर्गीय वाचनालय मंडळ संवत्सर यांच्या वतीने नुकतीच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४  वी जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भारुड सर तसेच सामाजिक कार्यकर्ते विजय काकडे ,पंकज चंदनशिव शरद गायकवाड ,बाळासाहेब गायकवाड ,अनिल थोरात आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पंडित भारुड म्हणाले की, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या यांच्या स्त्री शिक्षण चळवळ व सामाजिक चळवळीमुळे, दलित उद्धार आणि सामाजिक न्याय निर्माण झाल्यामुळे समाजातील बहुजन वर्गातील स्त्रिया आज उच्च पदावर पोहोचलेल्या आहेत. सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक, शैक्षणिक योगदानामुळेच आजच्या स्त्रीया प्रगतीपथावर असल्याचे प्रतिपादन ‘क्रांतिसूर्या’ पुस्तकाचे लेखक व क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले वाचनालयाचे अध्यक्ष पंडित भारुड सर यांनी बोलताना व्यक्त केले.

भारुड पुढे म्हणाले की, महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण व तंत्रज्ञान विभागाद्वारे ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रामधील  सार्वजनिक ग्रंथालय ,महाविद्यालयीन ग्रंथालय, विद्यापीठातील ग्रंथालय यामध्ये सुरू केलेला असून शासनाने तसं परिपत्रक काढलेलले आहे .तरुणांमध्ये, वाचकांमध्ये वाचन संस्कार ,वाचन चळवळ वाचन संकल्प निर्माण झाला पाहिजे या उद्देशाने ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा ‘उपक्रम सुरू असल्याने विद्यार्थ्यांनी वाचनालयातील पुस्तकाचा अवांतर वाचनासाठी लाभ घ्यावा व आपलं ज्ञान वाढवावे, तसेच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज ,महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाहीर अण्णाभाऊ साठे, यांच्या कार्याचा विचाराचा वारसा पुढे नेऊन तरुणांनी, वाचकांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा विचाराचा प्रचार आणि प्रसार करावा असे आवाहन भारुड यांनी आपल्या भाषणात केले.प्रस्ताविक पंकज कांबळे यांनी केले तर आभार विजय काकडे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here