संविधानाच्या प्रति शालेय विद्यार्थ्यांना देऊन सम्यक फाउंडेशनची अनोखी भीम जयंती कौतुकास्पद – वासुदेव देसले

0

 कोपरगाव प्रतिनिधी :- बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती संपूर्ण देशात व परदेशात विविध प्रकारे साजरी केली जात.पण कोपरगाव मध्ये शालेय विद्यार्थ्यांना संविधानाच्या प्रति देऊन सम्यक फाउंडेशनने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची जयंती साजरी करून एक नवा आदर्श निर्माण केला असल्याचे कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले म्हणाले. सम्यक फाउंडेशनच्या वतीने लुंबिनी बुद्ध विहार कोपरगाव येथे आयोजित भीम जयंतीच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून वासुदेव देसले उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच सम्यक फाउंडेशनचे अध्यक्ष महेंद्र विधाते हे होते. जयंतीच्या मिरवणूक व इतर खर्चाला फाटा देऊन संविधानाच्या प्रति विद्यार्थ्यांना मोफत देण्यात आल्या. यावेळी एम के आढाव विद्यालयाच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या तसेच भास्कर वस्ती येथील शालेय विद्यार्थी उपस्थित होते. संविधान हे आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे, संविधानाचा अंगीकार केल्याने आपले जीवन जगणे सुलभ होईल म्हणून त्याचे वाचन करून अनुकरण करा असे कार्यक्रमाचे अध्यक्ष महेंद्र विधाते यांनी सांगितले. यावेळी एम के आढाव विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र वानखेडे सर, बुद्ध धम्म प्रसारक मंडळाचे विश्वस्त प्रल्हाद जमधडे तसेच एसटी युनियनचे प्रसन्न खंडवे व सम्यक फाउंडेशनचे विश्वस्त श्रीकांत लिमजे, अशोक ओव्हाळ ,दिकोंडा मल्लय्या, मनोज श्रीखंडे ,सीमा नरवडे, कविता दिवारे आधी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फाउंडेशनच्या विश्वस्त सविता विधाते यांनी केले तर एम के विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र वानखेडे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here