श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत “मी साने गुरुजी बोलतोय” -अभिवाचन कार्यक्रम संपन्न
कोपरगाव :- येथील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात सावित्रीबाई फुले ज्ञानपीठ प्रतिष्ठानच्या वतीने ‘ मी साने गुरुजी बोलतोय ‘ या अभिवाचन कार्यक्रम शेवगांव येथिल बाळासाहेब भारदे विदयालयांतील येथिल श्री.ऊमेश घेवारीकर यांनी केले.
अभिवाचन करताना घेवारीकर म्हणाले की कोरोना नंतर मुलांमधील कार्यक्षमतेवर परिणाम झाला असुन त्यामुळे ती रागिट,आक्रमक बनली आहे. या मुलांमधील हरवत चाललेले सुसंस्कार पुन्हा जागविले पाहिजे, वाचनसंस्कृती टिकवण्यासाठी साने गुरुजी संस्कार माला रुजविण्यासाठी असे उपक्रम सतत राबविले गेले पाहिजेत. ते म्हणाले यासाठी या श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांने सुरु केलेला साने गुरुजीचे शामची आईच्या पुस्तकांचे वाचन प्रकल्प आदर्श ठरेल.
या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मकरंद कोऱ्हाळकर यांनी केले. सुत्रसंचालन सुरेश गोरे यांनी केले. आभार रघुनाथ लकारे यांनी मानले. याप्रसंगी सावित्री बाई फुले ज्ञानपीठ प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ.संगिता मालकर, उपमुख्याध्यापक रमेश गायकवाड, पर्यवेक्षक श्रीमती उमा रायते,साहित्यिक हेमचंद्र भवर, शिक्षक वृंद ,विदयार्थी आदि उपस्थित होते.
संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी शामची आई पुस्तकांचे वाचन होणे आवश्यक : ऊमेश घेवारीकर
श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत "मी साने गुरुजी बोलतोय" -अभिवाचन कार्यक्रम संपन्न