सकाळी सकाळी तो आला डोळ्या देखत संसार उद्धवस्त झाला.

0

प्रपंचाची हाणी  पाहिल्यानंतर कुटुंबातील सदस्यांना आश्रू आनावर

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी 

                शुक्रवारी सकाळी 11वाजता काळेकुट्ट ढग भरुन आले.पहाता पहाता वादळीवारा सुटला अनेकांचे प्रपंच डोळ्यादेखत उडुन गेले.डोक्यावरील छत गेल्याने जीव मुठीत धरत कुटुंबातील प्रत्येकजण एकमेकांना आधार देत वादळ थांबण्याची वाट पाहत होते.वादळ थांबल्या नंतर प्रपंचाची हाणी झाल्याचे पाहिल्यानंतर कुटुंबातील सदस्यांना दुःखाचे आश्रू आवरता आले नाही.घराच्या छताबरोबर काही मौल्यवान वस्तूही वादळीवाऱ्या बरोबर उडुन गेल्याने व घरातील साहित्य, धान्य भिजले.या वादळाचा तडाखा उंबरे, ब्राम्हणी, वळण,मानोरी,केंदळ, चणकापूर, मांजरी व राहुरी शहरासह तालूक्यातील काही भागाला चांगला बसला आहे.

             वादळी वाऱ्यासह पावसाने चांगलेच झोडपून काढले. शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांचे प्रचंड नूकसान होऊन मोठ मोठी झाडे वादळच्या तडाख्यात सापडून उन्मळून पडली. अनेक संसार उघड्यावर आले. 

          गेल्या तीन दिवसांपासून राहुरी तालूक्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. दोन दिवसांपूर्वी सायंकाळच्या सुमारास शहरात व तालूक्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाने हाहाकार माजवीला होता. त्यावेळी मोठ्या प्रमाणावर आर्थिक नूकसान झाले होते. 

          शुक्रवार दिनांक २८ एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजे दरम्यान तालूक्यातील केंदळ, चणकापूर, मांजरी, ब्राम्हणी, उंबरे आदि गावात जोरदार वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने अक्षरशः थैमान घातले. अनेक लोकांच्या घरावरील पत्रे उडून गेली. शेती मालाचे प्रचंड नूकसान झाले. तसेच मोठ मोठी झाडे काही क्षणातच उन्मळून पडली. काही ठिकाणी रस्त्यावर झाडे पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. विद्युत वाहिनीच्या पोल पडल्याने परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला. या वादळामुळे काही लोकांची घरे पडली. तर घरावरील पत्रे पत्त्यासारखी हवेत तरंगत होती. ब्राह्मणी केंदळ रस्त्यावर राजदेव वस्तीवरील संदीप नामदेव राजदेव , दत्तात्रय रामकृष्ण राजदेव, बाळासाहेब कुंडलिक राजदेव या तिघांच्या राहत्या घराचे पत्र उडून गेले. प्रपंच उघड्यावर पडला. घरातील साहित्य, धान्य भिजले. तर सोमनाथ दामोदर राजदेव…यांच्या गायाच्या गोठ्याचे पत्रे उडून गेले.

मानमोडी परिसरात दत्तात्रय हापसे रतन सूर्यवंशी पिंटू ठूबे यांच्या राहत्या घराचे नुकसान झाल्याची माहिती ब्राह्मणीचे कामगार तलाठी यांनी दिली.

          यामुळे शेतकऱ्यांसह सर्व सामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नूकसान झाले. अनेक जणांचे संसार उघड्यावर आले. रस्त्यावर झाडे पडल्याने अनेक ठिकाणचे रस्ते बंद झाले.गेल्या तीन दिवसा पासुन सलग होणाऱ्या वादळीवाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुमारे एक तास सुरू असलेल्या या वादळी वाऱ्यासह पावसाने अनेक जणांचे संसार उद्ध्वस्त होऊन दाणादाण झाली. शासनाने त्वरित पंचनामे करून नूकसान भरपाई द्यावी. अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here