सत्त्याच्या शोधासाठी अभ्यासपूर्ण मेहनत ही पत्रकारांची ऊर्जा – डॉ.उदय निरगुडकर

0

पत्रकार दिन संजीवनीत उत्साहात साजरा

कोपरगाव : पत्रकार दिनानिमित्त कोपरगाव व पंचक्रोशीतील विविध पत्रकार बांधवांचा सन्मान संजीवनी उद्योग समूह आणि संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टीट्युटच्या वतीने ७ जानेवारी २०२४ रोजी करण्यात आला. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. उदयजी निरगुडकर यांच्या अभ्यासू मार्गदर्शनाने सभागृह मंत्रमुग्ध झाल्याची अनुभूती आली.

या प्रसंगी बोलताना डॉ. निरगुडकर म्हणाले आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण सुरू करून प्रतिकूल काळात व्यवस्थेला न्यायाचा आरसा दाखवण्याचे काम केले.आपला भारत देश आज स्वयंपूर्ण होतो आहे.पूर्वी ९८% उपकरणे ही आयात होत होती मात्र आता आपण ९८% निर्मिती आपल्याच देशात करतो आहे. तत्वशिल पत्रकारिता हा पिंड जपला जाण्यासाठी ठाम राहणे गरजेचे आहे.सत्याच्या शोधासाठी वाट्टेल ते अशी कष्ट घेण्याची तयारी आपण ठेवली तर येणारा काळ हा अमृत काळ असणार आहे.जगाच्या स्पर्धेत आपल्या देशासाठी आगामी २५-३० वर्षे अतिशय महत्वाची असून सर्वाधिक तरुण असणारा देश म्हणून आपण विकासाची घोडदौड करतो आहे त्यामुळे कोण काय म्हणेल त्या पेक्षा आपण सतत कार्यरत असणे महत्वाचे ठरणार आहे.कोण काय बोलतात त्या पेक्षा आपण तत्वांशी तडजोड न करता घेतलेली भूमिका ही यशापासून रोखू शकत नाही.स्पर्धेच्या युगात बातमीचा दर्जा टिकवणे ही आपली जबाबदारी आहे असेही निरगुडकर म्हणाले.

या प्रसंगी भाजपा नेत्या मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा उपस्थितांना दिल्या.निरपेक्ष पत्रकार हे राष्ट्र घडविण्यासाठी मोलाची भूमिका बजावतात.पत्रकारिता ही लोकशाहीचा कणा असून देशाच्या सर्वांगीण विकासाचे चित्र त्यामुळे निर्माण होणे सहज शक्य आहे.गतिमान व्यवस्था आणि बदलत्या  काळासोबत आपणही तंत्रज्ञानाचे नाविन्य अवगत करून स्पर्धा करने काळाची गरज आहे.दैनंदिन धावपळीच्या काळात आपले कुटुंब आणि प्रकृतीची देखील काळजी सर्वांनी घेण्याची आवश्यकता आहे. माजी मंत्री स्व.शंकररावजी कोल्हे साहेब यांनी आम्हाला जो वसा समाजसेवेचा दिला आहे त्याला पुढे घेऊन जाण्यासाठी सर्वांचे सहकार्य आहे.स्व.कोल्हे साहेब यांनी पाणी,सहकार,शेती,रोजगार यासह विविध क्षेत्रातील अभ्यास करून पत्रकारांशी अनेकदा वैचारिक आदान प्रदान केलेल्या प्रसंगाना उजाळा सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी दिला

या वेळी सर्व पत्रकारांचा सत्कार मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला.मंचावर संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टीट्युटचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमितदादा कोल्हे,सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे,श्री.अंत्रे आदी उपस्थित होते.सूत्रसंचालन प्रा.साहेबराव दवंगे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here