सत्यजीत तांबे यांना ‘मुख्याध्यापक’ मंडळाचा पाठिंबा

0

संगमनेर : नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी होणाऱ्या निवडणुकीमध्ये सत्यजीत तांबे हे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहेत. नाशिक पदवीधर मतदारसंघातून त्यांना विविध शिक्षक संघटनांकडून मिळणारा पाठिंबा हा दिवसागणिक वाढत चालला आहे. राज्यातील ‘प्राथमिक व उच्च प्राथमिक मुख्याध्यापक सेवा मंडळ’ यांनी देखील सत्यजीत तांबे यांना आपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला असून, त्याबाबतचे पत्रही त्यांनी सत्यजीत तांबे यांना दिले आहे. बुधवारी शिक्षक भारती आणि त्यापूर्वीच महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष शिक्षक संघटना (MUST) आणि महाराष्ट्र राज्य खासगी शिक्षक संघटना यांनी तांबे यांना बिनशर्त पाठींबा जाहीर केल्याने अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी नाशिक पदवीधरचा गड काबीज करायला सुरुवात केल्याचे बोलले जात आहे.
           नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी.आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी आपल्या आमदार पदाच्या कार्यकाळात आमच्या अनेक प्रश्नांची सोडवणूक केली आहे. त्यांच्याच वारसा पुढे नेत एक तरुण, होतकरू व अभ्यासू व्यक्तिमत्व असणारे सत्यजीत तांबे हेसुद्धा आमचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम कटिबद्ध राहतील, अशी आम्हाला खात्री आहे. म्हणून आमचे राज्यनेते अरुण आवारी व राज्य कार्यकारिणी त्यांना बिनशर्त पाठिंबा देत असून मतदारसंघातील व इतर जिल्ह्यांतील सर्व सभासदांनी सत्यजीत तांबे यांना भरघोस मतांनी विजयी करावे; असे आवाहन प्राथमिक व उच्च प्राथमिक मुख्याध्यापक सेवा मंडळ यांनी सत्यजीत तांबे यांना दिलेल्या पाठिंबा पत्रात केले आहे.सत्यजीत तांबे यांना महाविकास आघाडीचा पाठींबा नसला तरी देखील आमदार सुधीर तांबे यांनी केलेली कामे आणि सत्यजीत तांबे यांचा दांडगा राजकीय अनुभव आणि काम करण्याची पद्धत यामुळे त्यांची लोकप्रियता ही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. परिणामी अपक्ष निवडणूक लढून देखील मोठ्या प्रमाणात मतदार आणि विविध संघटना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here