सदस्य पदाच्या बहुमताच्या सदस्य संख्येत कोल्हे-काळे यांच्या पारड्यात समतोल बहुमत

0

कोपरगाव : कोपरगाव मतदारसंघाच्या २१ ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. सरपंच संख्येने काळे गट पुढे दिसत असला तरी सदस्य संख्येत मात्र कोल्हे काळे Kolhe-Kale यांना समान कौल मिळाल्याचे चित्र आहे.

कोल्हे गटाकडे ८ ग्रामपंचायत मद्ये सदस्य संख्येत वर्चस्व आहे तर काळे गटाकडे १०,औताडे कोल्हे युती १,अपक्ष १,स्थानिक आघाडी १ (कोल्हे जवरे) असे बलाबल झाले असून काही ग्रामपंचायत या अल्पशा फरकाने सदस्य कमी अधिक झाल्याने गणिते काय होणार याकडे आगामी काळात लक्ष लागून असेल.

ब्राम्हणगाव,बोलकी,धोत्रे,मुर्शतपूर, पुणतांबा,वाकडी,चितळी,पोहेगाव, जवळके,लौकी,चांदगव्हाण आदी ठिकाणी काळे गटाचे सदस्य संख्या कमी असून बहुमताच्या दृष्टीने कोल्हे आणि इतरांचे वर्चस्व राहिले आहे.तर सुरेगाव,कारवाडी,मंजूर,दहेगाव,वारी, कान्हेगाव,घोयेगाव,शहाजापुर आदी ठिकाणी काळे गटाचे सदस्य संख्या बहुमता जवळ आहे.कुंभारीत अपक्ष पॅनल सत्तेत आला आहे.

एकंदरीत कोल्हे आणि काळे यांच्या सदस्य बहुमताच्या जोरावर होणारे वर्चस्व समसमान झाले असून चुरशीच्या असणाऱ्या स्थानिक निवडणुका या अनेक लहान प्रश्नावर आणि समस्यांवर येऊन ठेपत असतात.मोठ्या मतदारसंख्या असणारी गावे ही कोल्हे गटाला अनुकल ठरली तर कमी मतदारसंख्या असणाऱ्या गावात काळे गटाला संख्या वाढविण्यात यश आल्याचे समिश्र चित्र निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here