देवळाली प्रवरा / प्रतिनिधी : शहरी भागात जिल्हा पुरवठा ते दुकानदार तर ग्रामिण भागात तहसिल गोडाऊन ते दुकानदार असे दोन प्रकारात धान्य वितरण केले जाते. धान्य पुरवठा उशिरा झाला असेल कमी दिवसात धान्य वितरणाची जबाबदारी जशी दुकानदारावर आहे. तशीच शिधापञिका धारकांचीही रांगेत उभे राहुन मोफत धान्याचा लाभ घेण्याची जबाबदारी आहे.अनेक शिधापञिका धारक धान्यच नेत नाही. धान्य नेणारे किती लाभार्थी वंचित राहिले याचा शोध घेवून जिल्हा पुरवठा अधिकारी पञ व्यवहार करुन धान्य नेणारे परंतू सप्टेंबर महिन्यात वंचित राहिल्यांसाठी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी परवानगीने आँक्टोबर महिन्यात धान्य वितरण करण्यात येईल. असे राहुरी तहसिलदार नामदेवराव पाटील यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
सष्टेबर महिण्यास अवघ्या सहा दिवसात धान्य वितरण केल्याने मोफत मिळणाऱ्या धान्या पासुन अनेकजण वंचित राहिल्याचे वृत्त प्रकाशित झाल्या नंतर राहुरीचा पुरवठा विभाग खडबडून जागे झाले.राहुरीचे तहसिलदार नामदेवराव पाटील यांनी तालुका पुरवठा अधिकारी सुदर्शन केदार यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.केदार यांनी गुरवारी धान्य दुकानदारांचे जाब जबाब घेतले आहेत.धान्य दुकानदारांनी जबाब देताना शिधापञिका धारक यांना धान्य घेवून जाण्यास कळविले होते.परंतू तेवेळेत धान्य नेण्यासाठी आले नाही.असे नमुद केले असले तरी धान्य 24 सष्टेबर रोजी वाटप करण्यास सुरवात केल्याचे जबाबात नमुद करण्यात आले नाही.उशिरा धान्य वाटप करण्यामागे कोणाचे नियोजन होते.धान्य दुकानदारांनी 24 सष्टेबर पासुन जाणीव पुर्वक धान्य वितरण सुरु केले.अशा अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.
तहसिलदार पाटील यांनी धान्या पासुन वंचित राहिलेल्या शिधापञिका धारकांची यादी करण्यास सांगितली आहे.या यादीतील दरमहा धान्य नेणारे किती धान्य न नेणारे किती याची यादी स्वतंञ करण्यास सांगितली आहे.संबधित यादी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना पाठवून सष्टेबर महाण्यातील धान्य वितरणास पवारनगी घेण्यात येईल असे पाटील यांनी सांगितले.
कमी दिवसात शिधापञिका धारकांना धान्य वितरण केले जावू शकत नाही.अनेक गोरगरीब मजुरांची रोजंदारी बुडते.किमान धान्य वितरणाचा कालावधी 15 दिवसाचा ठेवावा अशी मागणी शिधापञिका धारकांकडून केली जात आहे.
शहरी भागात जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून उशिरा धान्य पुरवठा झाला की,धान्य दुकानदारांनी जाणीपुर्वक धान्य वितरण उशिरा सुरु केले.धान्य वितरण उशिरा सुरु करण्यामागची कारणे काय शिल्लक धान्य काळा बाजारात विकायचे होते का.?धान्य बाजारात कोणाकोणाचे हात गुंतले याचा शोध घेणे गरजे आहे.