सभासद शेतक-यांच्या उत्कर्षाबरोबरच परिसर स्थैर्यतेला कोल्हे कारखान्याची जोड-बिपीनदादा कोल्हे.

0

कोपरगांव:

            माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी आयुष्यात संघर्ष करत नियमांचे सतत पालन केले, जेथे प्रशासकीय शिस्त, नियम, आदर आणि काटकसर तेथे लक्ष्मीचा नेहमीच वास असतो, त्यांच्याच विचारांचा वसा आणि वारसा घेवुन संजीवनी उद्योग समुहाची प्रगतीकडे झेप सुरू आहे, सभासद, शेतकरी व त्यावर अवलंबुन असणा-या सर्व घटकांच्या उत्कर्षात आपल्या परिसरातल्या आर्थीक स्थैर्यतेला सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याची जोड असल्याचे प्रतिपादन बिपीनदादा कोल्हे यांनी केले.

           

 तालुक्यातील शिंगणापुर येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे सालाबाद प्रमाणे याही वर्षी दिपावली पर्वावर शुक्रवारी लक्ष्मीपुजन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व कारखान्याचे अभ्यासु नेतृत्व विवेक कोल्हे यांच्या शुभहस्ते पार पडले. त्याप्रसंगी ते सभासदांना मार्गदर्शन करतांना अध्यक्षपदावरून बोलत होते.

           कारखान्याचे उपाध्यक्ष मनेष गाडे व सर्व विद्यमान संचालक मंडळाने उपस्थितांचे स्वागत केले. एक्साईज पोलिस दलात राहुल मच्छिंद्र राहणे यांची निवड झाल्याबददल तसेच कारखान्याचे उपाध्यक्ष मनेष गाडे यांचा वाढदिवसानिमीत्त बिपीनदादा कोल्हे, विवेक कोल्हे यांनी सत्कार केला.

         

प्रारंभी मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव जी. सुतार यांनी प्रास्तविकांत सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या प्रगतीची घौडदौड सांगत सीएनजी प्रकल्प अंतीम टप्प्यात असल्याचे सांगुन चालु गळीत हंगामात कारखान्यांने ७ लाख मे. टन उस गाळपाचे उददीष्ट ठेवले असुन सर्व उपप्रकल्प जोमाने चालविण्यासाठी त्याची सर्व पुर्वतयारी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here