श्री क्षेत्र देवगड येथे पत्रकार दिन lसाजरा…
कुकाणा प्रतिनिधी /इस्माईल शेख :
एकता पत्रकार संघाच्या वतीने श्री क्षेत्र देवगड येथे गुरुदेव दत्त पिठाचे प्रमुख महंत गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली नेवामा तालुक्यातील पत्रकारांनी एकत्रित येऊन पत्रकार दिन साजरा केला. समाज जागृतीसाठी पत्रकारांचे कार्य कसरतीसारखे असून देशाचे वैभव वाढीसाठी व समाजात समरसता निर्माण होण्यासाठी पत्रकारांनी काम करावे, सन्मान स्वीकारणाऱ्यांनी अपमान सहन करण्याची देखील तयार ठेवावी असे प्रतिपादन गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराजांनी यावेळी बोलतांना केले.
श्री क्षेत्र देवगड येथील यात्रा निवास सभागृहात झालेल्या कार्यक्रम प्रसंगी गुरुव श्री भास्करगिरीजी महाराजांच्या समवेत नेवासा तालुका एका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. सुनील गजे मार्गदर्शक विनायकराव दरंदले, गुरुप्रसाद देशपांडे मुखदेव फुलारी, नेवासा प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन मायकवाड, जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष बाळासाहेब पत्रकार परिषदेचे अध्यक्ष सोमनाथ बाळकृष्ण महाराज कानडे, देवगड भ मराठवाडा विभाग प्रमुख जग विधाते, मुरमे गावचे सरपंच साबळे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
चांगले काम वाईट काय याचे मंथन करून समाजापुढे मांडता पत्रकाराचे काम आहे, पत्रकारांचा झालेला आहे. समाजात अनेक होणाऱ्या घडामोडी समाज्याला कळाव्यात म्हणून पत्रकार आपलाजीव धोक्यात वार्ताकन करतात,ही वस्तुस्थिती देखील त्यांनी यावेळी बोलताना विषद केली. सर्व जाती धर्माची देवस्थाने ही समाजाच्या करीता आहे. तिर्थक्षेत्रांच्या होणान्या प्रगतीमुळे उद्योग व्यवसाय उभे रहातात त्यामुळे परीसरातील करण्यात आले. लोकांना रोजगार उपलब्ध होत असतो सर्व आवेली झालेल्या कार्यक्रमाचे देवस्थानच्या उत्कर्षासाठी देखील पत्रकारांनी योगदान यावे असे आवाहन त्यांनी केले.
गुरुवर्य महंत श्री भास्करगिरीजी महाराज यांच्या हस्ते दर्पणकार बाळशासानाचा नसून त्याच्या गुणांचा समान यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. दिपप्रज्वलन पत्रकार दिन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला तसेच दिवंगत झालेल्या पत्रकाराच्या स्मृतीस अभिवादन करून अर्पित करण्यात आली. नेवासा तालुका एकता पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. सुनील गर्जे यांनी प्रास्ताविक केले. पत्रकार गुरुप्रसाद देशपांडे यांनी पुरस्कार मिळालेल्या पत्रकारांचा परिचय करून दिला.
यावेळी बोलतांना गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज म्हणाले की पत्रकारिता करतांना पत्रकारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. सन्मानाबरोबर अवमानही सहन करावा लागतो. भास्करगिरीजी महाराजांच्या हस्ते बन्सीभाऊ एडके (आदर्श वृत्तपत्र विक्रेता), उमाकांत भोगे (जीवन गौरव, अशोक डाले आदर्श पत्रकारिता), सोपान भगत (इलेक्ट्रॉनिक मीडिया) पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.. तर उपस्थित पत्रकार बांधवांना माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांच्या वतीने डायरी लेखणी, गुलाबपुष्प, देऊन सत्कार करण्यात आला .
सूत्रसंचालन नेवासा तालुका एकता पत्रकार उपाध्यक्ष पत्रकार सुधीर यांनी यावेळी गुरुवर्य केले तर जेष्ठ पत्रकार विनायकराव दरंदले यांनी उपस्थित मान्यवर व पत्रकार बांधवांचे आभार मानले. उपस्थित पत्रकारांना मिटान भोजन देऊन पत्रकार दिन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.