देवळाली प्रवरा /प्रतिनिधी :
येथील आंबी रोडवरील सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत शहादावल बाबा दर्गा,यांचा यात्रा उत्सव (उरूस)शुक्रवार दिनांक ५ मे रोजी संपन्न होणार असून या निमित्त खादिम कमेटी व मौलाना आझाद प्रतिष्ठान च्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहिती दर्गा चे प्रमुख अकील बाबा पटेल यांनी दिली.
गुरुवार दिनांक ४ रोजी सकाळी ९ वाजता भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले पहा तर दुपारी चार वाजता सामुदाईक खतनाचा कार्यक्रम होणार आहे.
शुक्रवार दि. ५ रोजी सायंकाळी ७. १५ वाजता अजमेर हून आणलेल्या खास चादरचे अर्पण सोहळा,त्यांनंतर साडे सात ते साडे नऊ पर्यंत भव्य भंडारा(लंगर) कार्यक्रम,त्यांनतर रात्री साडे नऊ वाजता सुप्रसिद्ध कव्वाली गायक युसूफ शोला यांचा बहारदार कव्वाली चा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
या सर्व संस्कृतिक,धार्मिक व सामाजिक कार्यासाठी पंचक्रोशी तील भविकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे अवाहन हजरत अकील बाबा पटेल,अब्बास पटेल परिवार तसेच खादिम कमेटी यांनी केले आहे.