सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना कार्यस्थळावर श्री गणपतीची प्रतिष्ठापना

0

कोपरगाव (प्रतिनधी)  सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर याहीवर्षी  गणपतीची प्रतिष्ठापना संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आली.

             गणपती ही बुद्धीची देवता आहे, प्रत्येक चांगल्या कार्यात गणपतीचे पूजन करून त्याची सुरुवात केली जाते, अज्ञान दूर करण्याचे काम गणपती देवता करते, समर्थ रामदास स्वामींनी मोजक्या शब्दात या जगाला गणपतीची आरती दिली, प्रत्येक संकट दूर करण्यात स्वतःचे कार्य, अध्यात्मिक अधिष्ठानाबरोबरच ईश्वरीय शक्ती सदैव साथ देते असे बिपिनदादा कोल्हे म्हणाले. यंदाचा हंगाम व कारखान्याचे इतर सर्व उपप्रकल्प यशस्वी होऊ दे अशी आराधना त्यांनी गणपतीचरणी केली.

         

प्रारंभी कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांनी उपस्थितांचे स्वागत केले.  माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी कारखाना स्थापनेपासून कार्यस्थळावर आध्यात्मिक, सांस्कृतिक यासह विविध उपक्रमांना नेहमीच प्रोत्साहन दिलेले असून ती परंपरा संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली व कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेक कोल्हे यांचे नेतृत्वाखाली कामगार बांधवांनी जपलेली असल्याचे व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे यांनी सांगितले.

          याप्रसंगी साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, इतर सर्व खाते प्रमुख, उप खाते प्रमुख, कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी उपलेखाधिकारी प्रवीण टेमगर यांनी आभार मानले. दहा दिवसांचे काळात गणेश स्टेज, संजीवनी येथे विविध धार्मिक कार्यक्रमाबरोबरच आनंद संगीत विद्यालयाचे आनंदराव आढाव यांचा अध्यात्मिक भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे., तरी कामगार बांधवांनी जास्तीच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सांस्कृतिक मंडळाचे वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here