सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सह साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

0

शिर्डी/संगमनेर दि. १- संगमनेर येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाचा पंचवार्षिक २०२५-३० साठीचा निवडणूक कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे यांनी जाहीर केला आहे.

निवडणूक कार्यक्रमानुसार ११ मे २०२५ रोजी मतदान होणार असून १२ मे रोजी मतमोजणीनंतर निकाल घोषित केला जाणार आहे. नामनिर्देशन पत्रे निवडणूक निर्णय अधिकारी संगमनेर यांच्या कार्यालयात ३ एप्रिल ते ९ एप्रिल या कालावधीत साप्ताहिक व शासकीय सुट्टीचे दिवस वगळून सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मिळतील व स्वीकारण्यात येतील. प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी ११ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे. छाननीनंतर वैध नामनिर्देशन पत्रांची यादी १५ एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात येईल.

उमेदवार १५ एप्रिल ते २९ एप्रिल या कालावधीत अर्ज मागे घेऊ शकतात.  माघारीनंतर प्रत्यक्ष निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी व निवडणूक चिन्ह वाटप २ मे रोजी करण्यात येईल.

या निवडणुकीसाठी संगमनेर उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून, तर तहसीलदार धीरज मांजरे यांची सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची प्रारूप मतदार यादी २५ फेब्रुवारी व अंतिम मतदार यादी १९ मार्च २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, असे निवडणूक अधिसूचनेद्वारे कळविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here