सहज फाऊंडेशन व रोटरी क्लबची गुंडेगावच्या जि.प.शाळेस मोठी मदत

0

नगर – सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात काम करणार्‍या सहज फाऊंडेशन व रोटरी क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने नगर तालुक्यातील गुंडेगाव येथील पाऊतका वस्ती जिल्हा परिषदेच्या शाळेस विविध वस्तूंची व शैक्षणिक साहित्यांची मोठी मदत करण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांना व शिक्षकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी वॉटर फिल्टर, विद्यार्थ्यांना उजळीसाठी शैक्षणिक तक्ते, वाचनालयासाठी गोष्टींची पुस्तके तसेच सर्व विद्यार्थ्यांना स्पोर्टस ड्रेस, जेवण डबे, वॉटर बॅग, बूट व खाऊ देण्यात आला, अशी माहिती सहज फौंडेशनचे अध्यक्ष अशोक अकोलकर यांनी दिली.

     यावेळी रोटरी क्लब अहमदनगर मिडटाउनच्या माजी अध्यक्षा मधुरा झावरे, सहाय्यक प्रांतपाल क्षितिज झावरे, सहज फौंडेशनचे सागर मेहेत्रे, जालिंदर शिंदे, रामदास सुलाखे, तुषार चोरडिया, अंशुल अग्रवाल, सुचित खोडदे, शाळेच्या मुख्याध्यापिका मनिषा भालसिंग, शिक्षक धोंडीराम कुसळकर, ज्ञानदेव गंगाराम,  बबनराव हराळ, माधवराव हराळ, बाळू भापकर, राजेंद्र कुताळ, प्रवीण कुताळ, शरद कुताळ, दादासाहेब आगळे, सुनंदा भापकर आदी उपस्थित होते.

     यावेळी मधुरा झावरे म्हणाल्या, रोटरी क्लब कायमच सर्वप्रकारच्या सामाजिक कार्यात पुढे आहे. दुर्गम वाडी -वस्तींवरील शाळेतील विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक सुविधांचा अभाव असतो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जर सर्व चांगल्या सुविधा मिळाल्यातर त्यांची शैक्षणिक प्रगती होईल. यासाठी शाळेला मदत करण्यासाठी सहज फाउंडेशनच्या पुढाकाराने व त्यामुळे रोटरी क्लब मिडटाऊनच्या सहकार्याने सर्वप्रकारची मदत केली आहे. शालेय साहित्य मिळाल्यामुळे मुलांचा द्विगुणित झालेल्या आनंदातच आमचे समाधन असल्याचे सांगितले.

     मुख्याध्यापिका मनिषा भालसिंग यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा सादर केला. तसेच रोटरी क्लबच्या या उपक्रमांचे कौतुक करुन दिलेल्या मदतीबद्दल आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here