पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते सत्कार
नगर – येथील बांधकाम व्यावसायिक विठ्ठलराव रघुनाथ वायभासे यांचे चि. निखिल वायभासे यांची सहायक नगर रचनाकारपदी निवड झाली आहे. राज्य शासनाच्यावतीने घेण्यात आलेल्या सहायक नगर रचनाकार पदाच्या सन 2022- 23 स्पर्धा परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला, त्यामध्येही निखिल 38 वी रॅकने उत्तीर्ण झाले. यांने पुणे येथून सीओईपी महाविद्यालयातून अभियांत्रिकी पदवी व टाऊन प्लॅनिंग मधून एम.टेक अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. या पदावर विद्यापीठातून व सर्वात कमी वयाचे ते एकमेव ठरले आहेत.
या यशाबद्दल निखिल त्यांचा नुकताच जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, विठ्ठलराव वायभासे नगरसेवक सुनील त्र्यंबके आदी उपस्थित होते.