माजी सरपंच पांडुरंग जावळे यांच्याकडून 21 लाख रुपये तर राजाराम जावळे यांच्याकडून अर्धा गुंठा जागा
कोपरगाव (प्रतिनिधी) श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र देत साईबाबांनी सबका मालिक एक असल्याचे सांगितले आहे. धार्मिक कार्यात दान दिल्याने कमी पडत नाही. बँकेत पाच ते सहा वर्षांनी दाम दुप्पट होतात मात्र एका हाताने दान दिल्यावर दुसऱ्या हाताने लगेच भगवंत दाम दुप्पट देत असतो. पांडुरंग काशिनाथ जावळे यांनी साईबाबा मंदिर बांधण्याचा घेतलेला निर्णय हा सोनेवाडी गावच्या वैभवात भर घालणारा असल्याचे प्रतिपादन कुंभारी देवस्थानचे महंत राघवेश्वरानंदगिरीजी महाराज यांनी केले. शुक्रवारी ते सोनेवाडी येथे साईबाबा मंदिराच्या भूमीपूजनाच्या निमित्ताने बोलत होते.
साईबाबा मंदिरासाठी लागणारा सर्व खर्च 21 लाख रुपये माजी सरपंच पांडुरंग काशिनाथ जावळे करणार आहे. मंदिरासाठी अर्धा गुंठा जागा ही राजाराम गोकुळ जावळे यांनी उपलब्ध करून दिली आहे. मंदिर बांधकामासाठी लागणारी पाणी व्यवस्था बापूराव दगूराव जावळे यांनी केली आहे. महंत राघवेश्वरानंदगिरीजी महाराजांच्या उपस्थितीत राजाराम जावळे व सौ सुजाता जावळे यांनी सपत्नीक पूजा केली. पुरोहित गणेश कुलकर्णी यांच्या हस्ते पूजा अर्चा संपन्न करण्यात आली.
यावेळी सरपंच शकुंतला गुडघे,हरिभाऊ जावळे, गौतम बँकेचे उपाध्यक्ष बापूराव जावळे, दिगंबर जावळे, आबासाहेब दहे, विनायक चव्हाण, श्रीकांत जावळे,धर्मा पवार,भास्कर जावळे, सोमनाथ जावळे,संतु दहे, गोपीनाथ जावळे, साहेबराव मिंड, माजी पोलीस पाटील लक्ष्मण जावळे, बाबासाहेब जावळे, बाळासाहेब जावळे, निरंजन जावळे,गोपीनाथ जावळे, राहुल जावळे,द्वारकानाथ चव्हाण,शिवाजी शिंदे, संदीप जावळे, भाऊसाहेब गुडघे, शांताराम जावळे, शंकरराव जाधव, सोमनाथ रायभान,अदि उपस्थित होते. अभियंता श्रीकांत रांधव यांनी मंदिर बांधकामांचे प्लॅन इंस्टीमेंट दिले आहे तर मंदिर बांधकाम सोमनाथ रायभान करणार आहे.