कोपरगांव दि. १४ जुन २०२३-
महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त साखर आयुक्त म्हणून डॉ. राजेंद्र पुलकुंडवार यांनी नुकताच पदभार स्विकारल्याबददल त्यांचे संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्यावतीने सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांनी साखर संकुल पुणे येथे नुकतेच स्वागत केले.
याप्रसंगी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी महाराष्ट्र राज्यातील सध्याच्या साखर उद्योगाबाबत विविध मुददयावर भ्रमणध्वनीद्वारे चर्चा करत सहकारातील इनोव्हेटीव्ह शुगर फॅक्टरी म्हणून सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचा नावलौकीक असून देशपातळीवर सर्वप्रथम औषध निर्माती क्षेत्रात कारखान्याने यशस्वी पदार्पण केले असुन पॅरासिटामॉल या औषधाची निर्मीती केल्याची माहिती देवून डॉ. राजेंद्र पुलकुंडवार यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेक कोल्हे व संचालक मंडळातील सर्व सदस्यांच्यावतीने कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांनी समक्ष उपस्थित राहुन साखर आयुक्तांना शुभेच्छा दिल्या.