सातेफळ येथे दोन पिढ्यापासून मुस्लिम कुटुंबांकडुन गौराईची स्थापना 

0

जामखेड तालुका प्रतिनिधी – जामखेड तालुक्यातील सातेफळ येथे एका मुस्लिम कुटुंबांनी गौराईची स्थापना करून मागील दोन पिढ्यापासूनची ही परंपरा जोपासली जात आहे. सामाजिक सलोखा जोपासण्याचा प्रयत्नही कुटुंब करीत आहे. १९७२ सालच्या दुष्काळात रशीद दगडू सय्यद हे कुटुंबासह उदरनिर्वाहासाठी सातेफळ येथील खैरी मध्यम प्रकल्प कामानिमित्त स्थलांतरित झाले होते. त्यांचे मूळ गाव मलकापूर तालुका परंडा जिल्हा धाराशिव आहे. 

       

सातेफळ येथील रशीद दगडू सय्यद  यांचे कुटुंब मागील ३९ वर्षापासून गणेशोत्सव काळात गौरीची गणपती स्थापना करत आहेत. त्यांच्या गौरी स्थापनेबाबत कथाही रंजक आहे.काही वर्षांपूर्वी सय्यद यांचे वडील दगडू नन्हु सय्यद यांना शेतात काम करत असताना लक्ष्मीच्या दोन मूर्ती सापडल्या होत्या. सलग चार दिवस त्या मुर्ती तिथेच शेतात होत्या. त्या मूर्ती त्यांनी घरी आणल्या, त्या मूर्तीचे करायचं काय ? हा प्रश्न या कुटुंबास पडला होता .कुटुंबाने गावातील मंदिरातील पुजारी, मौलाना, ज्येष्ठ नागरिक यांच्याकडून सल्ला घेतला. तुम्ही भाग्यवान आहात तुम्हाला लक्ष्मी सापडल्या तुम्ही यापुढे दरवर्षी गौरीपूजन करून स्थापना करा अशी त्या कुटुंबाला सांगण्यात आले. तेव्हापासून सय्यद कुटुंब हे गौराईची स्थापना करत आहे गेल्या दोन पिढ्यापासून सय्यद कुटुंबानी ही परंपरा जपली आहे.

       

त्यांच्या कुटुंबातील रशीद दगडू सय्यद, सुग्रबी रशीद सय्यद, मलिक रशीद सय्यद, शेहनाज मलिक सय्यद, रमजान दगडू सय्यद, जरीना रमजान सय्यद, नौशाद मलिक सय्यद, मुस्कान मलिक सय्यद, आझाद मलिक सय्यद, नीम्रा रमजान सय्यद, शबाना फिरोज सय्यद, बेगम फिरोज पंजाबी , सिमरन फिरोज सय्यद, शाहिद फिरोज सय्यद हे सर्व कुटुंब दरवर्षी गौरीची स्थापना करून तीन दिवस उत्साहाचा सण साजरा करतात. सय्यद कुटुंबाच्या या अनोख्या सामाजिक उपक्रमाचे जामखेड तालुक्यातुन कौतुक होत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here