विश्वभारती अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये ‘समान संधी’ कार्यक्रम संपन्न
नगर – सायबर तंत्राान हे दुधारी शस्त्राप्रमाणे असून, विद्यार्थ्यांनी सोशल मिडिया माध्यमाचा जबाबदारीने वापर केल्यास भविष्यकाळात सायबर गुन्हे कमी होतील. विद्यार्थ्यांनी डिजिटल माध्यमातून आर्थिक व्यवहार करतांना पासवर्ड, ओटीपी कोणासही शेअर करु नये. तसेच सोशल मिडियावर कोणतीही पोस्ट लाईक आणि शेअर करतांना जबाबदारीचे भावव ठेवावे. आपल्या कृतीमधून जातीय तेवढ निर्माण होणार नाही व सामाजिक सलोखा कायम राहील याची काळजी घ्यावी. सध्याच्या काळात घडणार्या सायबर गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चुका नागरिकांकडून होत असून, विविध अमिषांना बळी पडून तरुणपिढी सायबर गुन्ह्यांमध्ये अडकत चालली आहे. त्यासाठी सोशल मिडियाचा वापर जबाबदारीने करा, असे मत अहमदनगर सायबर गुन्हे विभागाचे पोलिस उपनिरिक्षक सचिन रणशेवरे यांनी व्यक्त केले.
जामखेड रोडवरील विश्वभारती अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आयोजित ‘समान संधी’ कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी प्राचार्य, प्राध्यापकवृंद, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी पोलिस नाईक अभिजित अरकल यांनी विविध सायबर गुन्ह्यांमध्ये दाखल होणारे प्रकरणे, त्या संदर्भातील कायदे व नियम सांगितले. सायबर गुन्ह्यांबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार नोंदविण्यासाठी नागरिकांनी 1930 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. सायबर गुन्हे विभागातर्फे सर्व तक्रारींचे निवारण केले जाऊन मनस्ताप टाळता येईल, असे सांगितले.
या कार्यक्रमासाठी पोलिस अधिक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे विभागातील पो.उपनिरिक्षक प्रतिक कोळी, अभिजित खुळे यांनी विशेष सहकार्य केले. विश्वभारती महाविद्यालयाच्या प्राचार्या, विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी झाला.