राहुरी फॅक्टरीतील सावकार व्यापारी पिता पुत्राच्या प्रताप..!
देवळाली प्रवरा /राजेंद्र उंडे:
शेती गेली..घरातील महिलांचे दागिने गेले अन वेळोवळी लाखो रुपये व्याजही अदा केले.सावकाराने सगळ लुटले तरी पैशासाठी ञासाच देतोच अजून व्याज मागत असल्याने राहुरी फॅक्टरी येथील खासगी सावकारी करणाऱ्या व्यापारी पिता-पुत्रांच्या ञासाला कंटाळलेल्या वडनेर येथील तरुणाने विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याने राहुरी फॅक्टरीसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
वडनेर येथील हौशाबापु विठ्ठल बलमे यांनी राहुरी पोलीस व सहायक निबंधक यांच्याकडे यापूर्वीही संबंधित व्यापारी पिता पुत्रांची तक्रार केली होती.तक्रार केल्यानंतरही या व्यापाऱ्याने मी सावकारकी करतो,सगळ्यांना व्याजाच्या पैशातुन हप्ते देतो.त्यामुळे तु कितीही तक्रारी केल्या तरी माझ्यावर कोणीही कारवाई करणार नाही.
तक्रार केल्या पासुन सावकार व्यापारी पिता पुत्रानी आणखी तगादा वाढला.त्याच्या कडून अनेक मार्गाने ञास देण्याचे चालुच ठेवल्याने वडनेर परिसरातील तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने राहुरी फॅक्टरी सह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. राहुरी फँक्टरी येथिल सावकार व्यापारी पिता पुञावर पोलिस व साहय्यक निंबधक यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही.त्यामुळे अधिकारीही संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.