सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक योगदान अढळ दिपस्तंभा प्रमाणे:- अँड.नितीन पोळ

0

कोपरगांव :- महिला व बहुजन बांधवांना शिक्षण नाकारले असताना फुले दाम्पत्याने दिलेले शैक्षणिक योगदान अनेक पिढ्याना अढळ दिप स्तंभासारखे आहे असे प्रतिपादन लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी व्यक्त केले . कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व तांत्रिक विद्यालय कोपरगाव विद्यालयात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी प्रस्तावना मध्ये मनोगत व्यक्त करताना श्री लव्हाटे सर यांनी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले समाजातील अनिष्ट रूढींचा नाकारून शिक्षणाचे अस्त्र महिलांच्या हाती देणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचे पवित्र कार्य सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषणात विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री कातकडे एस बी सर यांनी स्त्री शिक्षणाचे महत्व सांगीतले

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून  बोलताना अँड.पोळ पुढे म्हणाले की ज्यावेळी महिला व अस्पृश्य यांना तत्कालीन व्यवस्थेने शिक्षण नाकारले होते. त्यावेळी शिक्षणाचे महत्त्व ओळखून व ज्योतिबानी सावित्री बाई यांना शिक्षण देऊन देशातील पहिली शिक्षिका बनवले व अनेक शाळा सुरू करून शिक्षणाची दारे बहुजन समाजातील मुलामुलींना खुली करून दिली. तोच आदर्श घेऊन पदमभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजनांच्या मुलांसाठी रयत शिक्षण संस्थेचा वटवृक्ष उभा केला असून क्रांती ज्योती सावित्री फुले यांचे शैक्षणिक योगदान अनेक पिढ्याना दिप स्तंभासारखे आहे.

या मुस्लिम विकास परिषदेचे श्री शफीक भाई सय्यद यांनी आर्थिक व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केले.

या प्रसंगी  कु भारती प्रभू बेलदार व चैतन्य कोकाटे या विद्यार्थ्यांनी सावित्री बाई फुले यांच्या जीवनावर आपले विचार व्यक्त केले

 सदरील कार्यक्रमास आदरणीय श्री आरिफ शेख,श्री सुजल चंदनशिव, श्री पत्रकार लाड,  सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण साबळे तसेच गुणवता कक्ष प्रमुख श्री सातव सर,श्री बत्तीसे सर,श्री पोळ सर,श्री दवंगे सर,क्रीडा विभाग प्रमुख श्री बोळीज सर, शालेय गणवेश वाटप प्रमुख श्री गावित एन एम श्री चैतन्य ढगे, श्री दिनेश चव्हाण, इत्यादी उपस्थित होते आभार श्री पोळ सर यांनी मांडले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here