मानाची गदा व साडेतीन लाख रुपयांचे पटकावले बक्षिस
जामखेड तालुका प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील साकत येथे साकेश्वर यात्रा उत्सव निमीत्त भव्य निकाली कुस्त्यांचे मैदान संपन्न झाले. यामध्ये प्रथम क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र केसरी पै. सिंकदर शेख विरूद्ध राष्ट्रीय विजेता पै. निशांत कुमार यांच्यात झाली यात सिकंदर शेख याने बाजी मारत ३,५०,०७० ( तीन लाख पन्नास हजार सत्तर रूपये) व मानाची गदा पटकावत साकेश्वर केसरी किताब पटकावला धारा गृप आँफ कंपनी इंदौर चे चेअरमन अनिल वराट तसेच धारा गृप च्या सदस्यांनी रोख इनाम व चांदीची गदा सिकंदर शेख यास प्रदान केली.
जामखेड तालुक्यातील साकतच्या हगाम्याची एक शिस्तबद्ध हगामा म्हणून नोंद आहे. या हगाम्यासाठी अनेक विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. महाराष्ट्र भरातून पैलवानांनी हजेरी लावली होती. यावेळी धारा गृप आँफ कंपनी इंदौर चे चेअरमन अनिल वराट सह सर्व सदस्य तसेच वंदना ठाकूर इंदौर विश्व बाँडी बिल्डिंग विजेता २०२५ तसेच नित्या सिंग मॅरेथॉन विजेत्या, नित्या सिंग, पै. देवा थापा नेपाळ, विष्णू वराट, हभप उत्तम महाराज वराट, प्रा. मधुकर राळेभात, मोहन पवार, अमित जाधव, आयोजक महादेव वराट, संजय वराट, मा.सभापती डॉ. भगवान मुरूमकर, राजाभाऊ वराट, माजी कृषी अधिकारी सुरेश वराट, समाजकल्याण अधिकारी विनोद वराट, मोहन अडसूळ, शहादेव वराट, देविदास वराट, कांतीलाल वराट, हरीभाऊ मुरूमकर, नवनाथ बहिर, हरीभाऊ वराट, पै. बापू जरे, दत्ता वराट, अजित वराट, बाजीराव वराट, नारायण लहाने, अजित वराट, श्रीराम घोडेस्वार, दादा घोडेस्वार, राम घोडेस्वार, कुस्ती निवेदक म्हणून धनाजी मदने पंढरपूर यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी क्रमांक दोनची कुस्ती हनुमंत पुरी विरुद्ध समिर शेख बरोबरीत सुटली, तृतीय क्रमांकासाठी संजय तनपुरे विरुद्ध शुभम मगर यांच्यात झाली यात संजय तनपुरे विजयी झाले. तसेच पै. पृथ्वीराज वनवे विरुद्ध धुळाजी विरकर, संदीप लटके विरुद्ध संदेश शिपकुले, पै संकेत हजारे विरुद्ध पांडुरंग कावळे या सर्व कुस्त्या बरोबरीत सुटल्या. यावेळी देवा थापा विरुद्ध सुरजीत कुमार या कुस्ती ने प्रेक्षकांचे मोठ्या प्रमाणात मनोरंजन केले.
सोमवार दि. १४ रोजी सकाळी ७.०० वा. कावड मिरवणूक व जल अभिषेक सात नद्यांच्या पाणी मिरवणूक यात लेझीम पथक सहभागी असतात गुलालाची उधळण करत मोठ्या उत्साहात देवाला जल अभिषेक करण्यात आले सायंकाळी चार वाजता शेरणी वाटप कार्यक्रम संपन्न झाले नंतर सायंकाळी सात वाजता सांस्कृतिक कार्यक्रम झाले व मंगळवारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे भव्य दिव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले होते.
कुस्ती हगाम्यासाठी पंच म्हणून पै. बाळासाहेब आवारे, पै. बापू जरे, पै. शरद कार्ले, पै. बालाजी जरे, पै. श्रीधर मुळे, पै. विठ्ठल देवकाते, पै. वसंत रसाळ, पै. सचिन दाताळ, पै. आलेश जगदाळे, पै. भारत शिंदे, पै. मारूती गाडे, पै. मोहन पवार, पै. शकिल शेख, पै. मोहन अडसूळ, पै. सुरेश मुरूमकर, पै. डांबे मामा तर कुस्ती निवेदक म्हणून धनाजी मदने पंढरपूर यांनी काम पाहिले.
या मैदानाचे मुख्य आकर्षण महाराष्ट्र केसरी सिंकदर शेख, राष्ट्रीय विजेता निशांत कुमार, पै. देवा थापा यांच्या कुस्त्यांचा थरार पाहावयास मिळाले. तसेच वंदना ठाकूर इंदौर विश्व बाँडी बिल्डिंग विजेता २०२५ तसेच नित्या सिंग मॅरेथॉन विजेत्या उपस्थित होत्या.